Virat Kohli : कोहलीचा विराट कारनामा, विशाखापट्टणममध्ये सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

Virat Kohli World Record : विराट कोहली याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामन्यात बॅटिंगने अप्रतिम कामगिरी केली. विराटने रांची आणि रायपूरमध्ये शतक तर विशाखापट्टणममध्ये अर्धशतक झळकावलं. विराटने या कामगिरीसह विश्व विक्रम केला आहे.

Virat Kohli : कोहलीचा विराट कारनामा, विशाखापट्टणममध्ये सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
IND vs SA 3rd Odi Virat Kohli Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 06, 2025 | 10:40 PM

टीम इंडियाने विशाखापट्टणममध्ये दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट्सने विजय मिळवत मालिकाही जिंकली. टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 271 धावांचं आव्हान 1 विकेट गमावून पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने भारताला अप्रतिम सुरुवात दिली. रोहितने 75 धावांची खेळी केली. तर यशस्वी आणि विराटने भारताला विजयापर्यंत पोहचवलं. विराटने सलग 2 चौकार लगावत सामन्याचा शेवट केला. भारताने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. विराटने या मालिकेत सलग 2 शतकं लगावली होती. त्यामुळे विराटला शतकांची हॅटट्रिक करण्याची संधी होती. मात्र सलामी जोडीने केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे विराटला शतकापर्यंत पोहचण्यासाठी धावाच उरल्या नाहीत.

भारतासाठी रोहित व्यतिरिक्त यशस्वीने सर्वाधिक नाबाद 116 धावा केल्या. तर विराटने नॉट आऊट 65 रन्स केल्या. यशस्वीला या शतकासाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर मालिकेत 2 शतकं आणि 1 अर्धशतकासह 300 पेक्षा अधिक धावा करणारा विराट कोहली मालिकावीर ठरला.

विराट कोहली याची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

विराटने या मालिकेतील 3 सामन्यांमध्ये 151 च्या सरासरीने 302 धावा केल्या. विराटने 24 चौकार आणि 12 षटकार लगावले. विराटने केलेल्या अप्रतिम कामगिरीसाठी त्याना मॅन ऑफ द सीरिज पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. विराटने यासह इतिहास घडवला. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मालिकावीर (POTS) पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू ठरला. विराटने यासह माजी दिग्गज सचिन तेंडुलकर याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.

विराट कोहलीचा कारनामा

विराटची वनडेत मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार जिंकण्याची 11 वी तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 20 वी वेळ ठरली. विराटने यासह सचिनला पछाडलं. विराटने यासह सचिनला मागे टाकलं.

किंग कोहली मॅन ऑफ द सीरिज

टॉप 5 मध्ये 2 भारतीय

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मालिका जिंकणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंमध्ये 3 माजी ऑलराउंडर्सचा समावेश आहे. यामध्ये शाकिब अल हसन, जॅक कॅलिस आणि सनथ जयसूर्या यांचा समावेश आहे. तर विराट व्यतिरिक्त या यादीत सचिन तेंडुलकर याचा समावेश आहे. तसेच विराट कोहली या टॉप 5 खेळाडूंपैकी एकमेव सक्रीय क्रिकेटपटू आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक POTS जिंकणारे खेळाडू

विराट कोहली (टीम इंडिया) : 20 मालिका

सचिन तेंडुलकर (टीम इंडिया) : 19 मालिका

शाकिब अल हसन (बांगलादेश) : 17 मालिका

जॅक कॅलिस  (दक्षिण आफ्रिका): 14 मालिका

सनथ जयसूर्या (श्रीलंका) : 13 मालिका