IND vs SA : लाईव्ह सामन्यात संजू सॅमसनचा जोरदार फटका, पंच मैदानातच कोसळले

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पाचवा आणि निर्णायक सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना आक्रमक सुरुवात केली. पण एक वेळ अशी आली की खेळाडूंची धाकधूक वाढली.

IND vs SA : लाईव्ह सामन्यात संजू सॅमसनचा जोरदार फटका, पंच मैदानातच कोसळले
IND vs SA : लाईव्ह सामन्यात संजू सॅमसनचा जोरदार फटका, पंच मैदानातच कोसळले; खेळाडू धावत आले
Image Credit source: Twitter
| Updated on: Dec 19, 2025 | 8:15 PM

भारत दक्षिण अफ्रिका टी20 मालिकेतील शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. भारताला मालिका जिंकण्यासाठी आणि दक्षिण अफ्रिका मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी विजय महत्त्वाचा आहे. या सामन्यात शुबमन गिलऐवजी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ओपनिंगला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने आक्रमक सुरुवात करून दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्मा 21 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार मारत 34 धावांवर बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसनने मोर्चा सांभाळला. तिलक वर्मा आणि संजू सॅमसनने आक्रमक खेळ पुढे नेण्याचा प्रयत् केला. दक्षिण अफ्रिकेकडून 9वं षटक टाकण्यासाठी डोनोवन फरेरा आला होता. भारताकडून त्याच्या पहिल्या दोन चेंडूवर तिलक वर्माने चौकार मारले. तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली आणि संजू सॅमसनला स्ट्राईक दिला. चौथ्या चेंडूवर संजू सॅमसन आक्रमक फटका मारण्याच्या हेतूने तयार होता. त्याने चौथ्या चेंडूवर आक्रमक फटका मारला.

संजू सॅमसनने सरळ जोरात चेंडू मारला आणि डोनोवन फरेराच्या हातात झेल होता. पण चेंडूचा वेग पाहता हा झेल पकडणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. त्याने झेल पकडण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही हातात बसला नाही. पण याचा फटका मात्र पंचांना बसला. स्ट्राईकवर रोहन पंडित पंच म्हणून उभे होते. काही समजण्याच्या आत त्यांनी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू जोरात गुडघ्यावर लागला. त्या चेंडूच्या वेगावरून त्यांना जोरात लागला असणार यात काही शंका नाही. चेंडू लागताच पंच रोहन पंडित मैदानात आडवे झाले. इतर खेळाडूंना जोरात लागल्याची कल्पना होती. त्यामुळे त्यांनी पंचांच्या दिशेने धाव घेतली.

दक्षिण अफ्रिकेच्या फिजिओने तात्काळ मैदानात धाव घेतली. भारतीय फिजिओही त्यांच्या मागे धावत मैदानात पोहोचले. त्या दोघांनी पंच रोहन पंडितचा पाय तपासला. किती दुखापत झाली आहे याची चाचपणी केली. त्यानंतर त्यांनी स्प्रे मारला. भारताचा वेगवान गोलंदाज हार्षित राणाने पंचांचा हात पकडून त्यांना कसं वाटतं आहे वारंवार विचारत होता. या सर्व घडामोडीत सामना काही काळ थांबवावा लागला. स्प्रे मारल्यानंतर काही मिनिटांनी रोहन पंडित ठीक झाले आणि पंच म्हणून मैदानात उभे राहिले. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर लिंडने सॅमसनला क्लिन बोल्ड केलं आणि तंबूत पाठवलं.

सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या मैदानात उतरला. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. पण या षटकारात कॅमेरामन जखमी झाला. त्याला जोरात चेंडू लागला. त्यामुळे किती जोरात लागला असेल याचा अंदाज खेळाडूंच्या प्रतिक्रियावरून लक्षात येतं.