
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20i मालिकेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. क्रिकेट चाहत्यांना टेस्ट आणि वनडे सीरिजनंतर उभयसंघातील टी 20i मालिकेचे वेध लागले आहेत. टीम इंडियाची कसोटी मालिकेत निराशाजनक कामगिरी राहिली. दक्षिण आफ्रिकेने भारताला 2-0 ने व्हाईटवॉश केलं. मात्र टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत पलटवार करत या पराभवाची परतफेड केली. भारताने एकदिवसीय मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. आता दोन्ही संघ नव्या कर्णधारांसह टी 20i मालिकेच्या थरारासाठी मैदानात उतरणार आहेत. मालिकेतील पहिला टी 20i सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना मंगळवारी 9 डिसेंबरला होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना ओडीशातील कटकमधील बाराबती स्टेडियम इथे आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस कोण जिंकणार? हे निश्चित होईल.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर टीव्ही9 मराठी वेबसाईटच्या पुढील लिंकवर https://www.tv9marathi.com/sports/cricket-news सामन्याबाबतीत लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.
दरम्यान ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेनंतर सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. तर एडन मार्रक्रम दक्षिण आफ्रिकेचं टी 20I मालिकेत नेतृत्व करणार आहे. एडनने टीम इंडिया विरुद्ध पहिल्या वनडेत टेम्बा बवुमा याच्या जागी नेतृत्व केलं होतं.