
भारतीय संघाने कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्यानंतर केएल राहुल याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i सीरिजमध्ये विजयी सुरुवात केली. भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका 0-2 ने गमवावी लागली. त्यामुळे भारतीय संघावर टी 20i मालिकेत चांगली कामगिरी करण्याचं आव्हान होतं. त्यानुसार भारताने मालिकेत आश्वासक सुरुवात केली. भारताने रविवारी 30 नोव्हेंबरला रांचीत झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात करत विजयी सलामी दिली. आता उभयसंघातील दुसरा सामना कधी आणि कुठे होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवीय सामना बुधवारी 3 डिसेंबरला होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवीय सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर टीव्ही9 मराठीच्या https://www.tv9marathi.com या वेबसाईटवर सामन्याबाबत लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवीय सामना मोबाईलवर जिओ हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी भारताला पहिल्या सामन्यात विजयी करण्यात बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली होती. या दोघांनी शतकी भागीदारी केली होती. तसेच विराटने शतक तर रोहितने अर्धशतक झळकावलं होतं. विराटने 135 धावांची खेळी साकारली होती. तर रोहितने 57 धावा केल्या होत्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारताने 349 धावांपर्यंत मजल मारली होती. तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला ऑलआऊट 332 धावाच करता आल्या.