
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी 20I सामना हा शुक्रवारी 19 डिसेंबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. मालिकेतील चौथा सामना धुक्यांमुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे मालिका रंगतदार स्थितीत आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला पाचवा आणि अंतिम सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेसमोर ही मालिका 2-2 ने बरोबरीचत सोडवण्याचं आव्हान आहे. अशात नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी कुणासाठी अनुकूल ठरणार? हे पीच रिपोर्टद्वारे जाणून घेऊयात.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांसाठी पूरक ठरु शकते. या मैदानात मोठी धावसंख्या होण्याची शक्यता अधिक आहे. आऊटफिल्ड फास्ट असल्याने या मैदानात मोठी धावसंख्या होऊ शकते. तसेच नव्या बॉलने गोलंदाजांना मदत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मैदान मोठं असल्याने फलंदाजांना अचूक अंदाज घेऊन फटकेबाजी करावी लागते.
सामन्यातील दुसऱ्या डावात दव (Due Factor) पडतं. त्यामुळे टॉस निर्णायक ठरतो. त्यामुळे टॉस फॅक्टर महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे टॉस जिंकणाऱ्या संघाचा फिल्डिंग करण्याला प्राधान्य असेल.
या मदैानात आतापर्यंत 7 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. या 7 पैकी 4 सामन्यांमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. तर 3 वेळा विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या मैदानात पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ही 180-185 इतकी आहे. आता शुक्रवारी संधी मिळाल्यास टीम इंडिया किती धावा करेल? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याला या मालिकेत आतापर्यंत 3 सामन्यांमध्ये काही खास करता आलं नाही. सूर्याला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाहीय. त्यामुळे चाहत्यांना सूर्याकडून पाचव्या आणि अंतिम सामन्यात मोठ्या खेळीची आशा आहे. आता सूर्या या मालिकेचा शेवट मोठ्या खेळीने करणार का? हे साम्यानंतरच स्पष्ट होईल.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.