IND vs SA: रिषभ पंतचा जोहान्सबर्गमध्ये धडाका, अनोखी सेंच्युरी करत धोनी किरमाणी यांच्या क्लबमध्ये प्रवेश

रिषभ पंत यानं सेंच्युरियन कसोटीत एक विक्रम नावावर केला होता. आता जोहान्सबर्ग कसोटीमध्ये देखील रिषभ पंतनं आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

IND vs SA: रिषभ पंतचा जोहान्सबर्गमध्ये धडाका, अनोखी सेंच्युरी करत धोनी किरमाणी यांच्या क्लबमध्ये प्रवेश
रिषभ पंत
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 12:29 PM

जोहान्सबर्ग : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडियानं पहिल्या सामन्यात विजय मिळवला असून सध्या दुसरी कसोटी सुरु आहे. विकेट कीपर रिषभ पंतला या मालिकेत बॅटिंगद्वारे कमाल दाखवता आली नसली तरी विकेट कीपर म्हणून त्याची कामगिरी चागंली होत आहे. रिषभ पंत यानं सेंच्युरियन कसोटीत एक विक्रम नावावर केला होता. आता जोहान्सबर्ग कसोटीमध्ये देखील रिषभ पंतनं आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

100 कॅच घेण्याचा विक्रम

रिषभ पंत यानं जोहान्सबर्ग कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर लुंगी एनगिडीचा कॅच घेतला. या कॅचसह रिषभ पंत यानं भारतासाठी कमी कसोटी सामन्यांमध्ये 100 कॅच घेण्याचा विक्रम नावावर केला. त्यानं केवळ 27 कसोटीमध्ये ही कामगिरी केली आहे.

रिषभ पंतच्या पूर्वी भारताकडून विकेट कीपर म्हणून 100 हून अधिक कॅच घेण्याची कामगिरी तीन खेळाडूंनी केली आहे. महेंद्रसिंह धोनी यानं 256, सय्यद किरमाणी यांनी 160 आणि किरण मोरे यांनी 110 कॅच घेतले आहेत. अशी कामगिरी करणारा रिषभ पंत हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 42 वा विकेट कीपर ठरला आहे.

सेंच्युरियन टेस्टमध्ये महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला

रिषभ पंत यांनी दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध पहिल्या कसोटीत एक विक्रम नावावर केला होता. त्यानं विकेट किपींग करताना जलद गतीनं 100 खेळाडूंना बाद करण्याचा विक्रम नावार केला होता. हा विक्रम पूर्वी महेंद्र सिंह धोनीच्या नावावर होता.

भारताला मालिका विजयाची संधी

टीम इंडियानं पहिल्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर आता या कसोटी विजय मिळवत मालिका खिशात घालण्याची ऐतिहासिक संधी मिळाली आहे. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यानंतर आता फलंदाजांनी चांगली खेळी केल्यास टीम इंडियाकडे ऐतिहासिक मालिका विजयाची संधी निर्माण झालीय.

इतर बातम्या:

IND vs SA: अजिंक्य-चेतेश्वरला ALL THE BEST, दोघांसाठी आज ‘करो या मरो’

Corona Virus चा रणजी करंडक स्पर्धेला फटका, BCCI ने नाईलाजाने घेतला ‘हा’ निर्णय

IND vs SA Rishabh Pant takes 100 test catches becoming fourth Indian wicketkeeper to join elite club with MS Dhoni

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.