IND vs SA: नवीन कॅप्टन  केएल राहुलच्या निर्णयांवर गावस्करांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, मांडलं रोखठोक मत

IND vs SA: नवीन कॅप्टन  केएल राहुलच्या निर्णयांवर गावस्करांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, मांडलं रोखठोक मत

याआधी गावस्कर यांनी अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांच्यावरही रोखठोक मत मांडल होतं. त्यानंतर दुसऱ्याडावात ऋषभ पंत ज्या पद्धतीने बाद झाला, त्यावरुनही झापलं होतं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 07, 2022 | 3:41 PM

जोहान्सबर्ग: दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांच्या चुकांवर सडेतोड टीका करणारे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी नवीन कर्णधार केएल राहुलच्या कॅप्टनशीपच्या काही निर्णयांवरही टीका केली आहे. त्यांनी राहुलच्या त्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. याआधी गावस्कर यांनी अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांच्यावरही रोखठोक मत मांडल होतं. त्यानंतर दुसऱ्याडावात ऋषभ पंत ज्या पद्धतीने बाद झाला, त्यावरुनही झापलं होतं. राहुल द्रविड त्याला सुनावेल असही गावस्कर म्हणाले होते. (IND vs SA sunil gavaskar raised questions on kl rahul captaincy decisions)

राहुल अजून चांगला निर्णय घेऊ शकला असता

आता सुनील गावस्कर यांनी नवीन कर्णधार केएल राहुलबद्दही आपलं मत व्यक्त केलं आहे. नियमित कर्णधार कोहली दुखापतग्रस्त झाल्यामुळे राहुलला नेतृत्वाची संधी मिळाली. दुसऱ्याडावाच्या सुरुवातीला राहुल अजून चांगल्या पद्धतीची क्षेत्ररक्षणची व्यूहरचना रचू शकला असता, असे गावस्कर म्हणाले.

एल्गरच काम सोपं केलं

“विराट कोहली खेळत नसलेला कसोटी सामना भारताने पहिल्यांदा गमावला. सिडनीमध्ये त्यांनी कसोटी सामना ड्रॉ केला होता. पण इतरवेळी ते जिंकले होते” असे गावस्कर म्हणाले. केएल राहुलने जी फिल्ड प्लेसमेंट केली, त्यावर गावस्करांनी टीका केली आहे. “दुसऱ्याडावाच्या सुरुवातीला कर्णधार डीन एल्गरला एकेरी-दुहेरी धावा सहजतेने काढू दिल्या. त्यामुळे त्याचं काम अधिक सोपं झालं” असं गावस्कर म्हणाले.

एल्गर हुकचा फटका खेळत नाही, मग…

“एल्गर हुकचा फटका खेळत नाही. त्यामुळे डीपमध्ये दोन क्षेत्ररक्षक ठेवण्यात काहीही अर्थ नव्हता. तो सहजतेने एकेरी धावा पळून काढत होता. भारताची फिल्डिंग अजून धारदार व्हायला पाहिजे होती. पण शेवटी दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला. भारतीय टीमने हा सामना गमावला नाही, तर दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला” असे गावस्कर म्हणाले.

संबंधित बातम्या:

बदली झाली आणि कलेक्टरनं बोऱ्या बिस्तर सगळा स्वत: गुंडाळला, का होतेय IAS ची देशभर चर्चा?
अमृता फडणवीसांचा विद्या चव्हाणांवर अब्रुनुकसानीचा दावा; नोटीस ट्वीट करून निर्वाणीचा इशारा…!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी आक्षेपार्ह लिखाण, नवी मुंबईत भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक

(IND vs SA sunil gavaskar raised questions on kl rahul captaincy decisions)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें