India vs South Africa T20 Team Squad 2022: दक्षिण आफ्रिका सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, केएल राहुल कॅप्टन

India vs South Africa T20 Team Squad 2022: दक्षिण आफ्रिका सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, केएल राहुल कॅप्टन
Team india T 20 squad for south Africa Series
Image Credit source: File photo

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी-20 आणि आयर्लंड विरुद्ध दोन 'टी-20 सामने खेळणार आहे. BCCI च्या निवड समितीने दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 22, 2022 | 6:53 PM

मुंबई इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 15 वा सीजन शेवटच्या टप्प्यात आहे. आज लीगमधील शेवटची मॅच खेळली जाणार आहे. त्यानंतर प्लेऑफचे सामने सुरु होतील. आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) पाच टी-20 आणि आयर्लंड विरुद्ध दोन ‘टी-20 सामने खेळणार आहे. BCCI च्या निवड समितीने दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. केएल राहुलला कॅप्टन बनवण्यात आलं आहे. आधी चर्चा होती, त्याप्रमाणे विराट कोहली, रोहित शर्मा या सिनियर खेळाडूंना टी-20 सीरीजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पाच टी 20 सामन्यांची मालिका 9 जून पासून सुरु होणार आहे. 19 जूनपर्यंत पाच सामने खेळले जातील. सिनियर खेळाडूंना विश्रांती देताना निवड समितीने संतुलित संघ निवडला आहे. टीम निवडीत अनुभव आणि युवा जोश याचं संतुलन राखण्यात आलं आहे.

कुठल्या सिनियर खेळाडूंना विश्रांती

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजसाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी या सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. विराट आणि रोहितचा चालू आयपीएलमध्ये फॉर्मसाठी संघर्ष सुरु आहे. त्यांना यंदाच्या सीजनमध्ये अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांना विश्रांती देण्यात येईल, अशी चर्चा होती. तसंच घडलं सुद्धा आहे.

दिनेश कार्तिकचं कमबॅक

यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. कार्तिक सध्या RCB साठी फिनिशरची भूमिका बजावतोय. 2019 नंतर दिनेश कार्तिकने संघात पुनरागमन केलं आहे. 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तो शेवटचा टी 20 सामना खेळला होता.

IPL गाजवणाऱ्या खेळाडूंना मिळाला चान्स

यंदाच्या सीजनमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या उमरान मलिकला टीम इंडियात संधी मिळाली आहे. सनरायजर्स हैदराबादच्या या गोलंदाजाने आपल्या वेगाने सर्वांना प्रभावित केलं आहे. त्याशिवाय पंजाब किंग्सच्या अर्शदीप सिंहला सुद्धा मिळाली आहे.

असा आहे टी-20 संघ

केएल राहुल (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें