Rohit Sharma : सिक्सर किंग रोहित, हिटमॅनची ऐतिहासिक कामगिरी, शाहिद आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

Rohit Sharma World Record : महेंद्रसिंह धोनी याच्या होम ग्राउंडमध्ये रोहित शर्मा याने 57 धावांची खेळी केली. रोहितने या दरम्यान वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सिक्स लगावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला.

Rohit Sharma : सिक्सर किंग रोहित, हिटमॅनची ऐतिहासिक कामगिरी, शाहिद आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
Rohit Sharma World Record
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 30, 2025 | 7:57 PM

टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट शतकाने केला. रोहितने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जसा शेवट केला तशीच सुरुवातही मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली आहे. रोहितने रांचीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खणखणीत अर्धशतक झळकावलं. रोहितने अवघ्या 43 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. रोहितला या सामन्यात शतक करण्याची संधी होती. रोहित ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता त्यानुसार तो सहज शतक करेल, असं वाटत होतं. मात्र मार्को यान्सेन याने रोहितच्या खेळीचा शेवट केला.

यान्सेनने रोहितला एलबीडब्ल्यू केलं. रोहितने 51 बॉलमध्ये 57 रन्स केल्या. रोहितने या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकार लगावले. रोहितने या खेळी दरम्यान इतिहास घडवला. रोहितने पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर शाहिद आफ्रिदी याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. रोहित आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारा बॅट्समन ठरला आहे.

रोहितची ऐतिहासिक कामगिरी

मार्को यान्सेन टीम इंडियाच्या डावातील 20वी ओव्हर टाकत होता. रोहितने या ओव्हरदरम्यान सिक्स लगावला. रोहितच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हा 352 सिक्स ठरला. रोहितने यासह शाहिद आफ्रिदी याचा 351 षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. आफ्रिदीच्या नावावर गेल्या 10 वर्षांपासून सर्वाधिक षटकारांचा विक्रम होता. मात्र आता रोहितने आफ्रिदीला पछाडलं.

विराटसोबत शतकी भागीदारी

दक्षिण आफ्रिकेने भारताला टॉस जिंकून बॅटिंगसाठी बोलावलं. यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली. यशस्वीने आक्रमक सुरुवात करत काही फटके मारले. यशस्वीला चांगली सुरुवातही मिळाली. मात्र यशस्वीला या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. भारताच्या 25 धावा असताना यशस्वी आऊट झाला. यशस्वीने 18 धावांच योगदान दिलं.

त्यानंतर रोहितची साथ देण्यासाठी विराट कोहला मैदानात आला. रोहित आणि विराट या दोघांनी चौफेर फटकेबाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. रोहित-विराटने या दरम्यान शतकी भागीदारी केली. शतकी भागीदारीनंतरही या दोघांनी फटकेबाजी सुरुच ठेवली. मात्र 22 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर मार्को यान्सेन याने रोहितला एलबीडब्ल्यू आऊट केलं. अशाप्रकारे ही जोडी फुटली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 109 बॉलमध्ये 136 रन्सची पार्टनरशीप केली

वनडेत सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज

रोहित शर्मा : 352 सिक्स

शाहिद आफ्रिदी : 351 सिक्स

ख्रिस गेल : 331 सिक्स

सनथ जयसूर्या : 270 सिक्स

महेंद्रसिंह धोनी : 229 सिक्स