IND vs SA 2nd Test : भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा आणि अंतिम सामना गुवाहाटीत, किती वाजता सुरुवात होणार?

India vs South Africa 2nd Test Live Streaming : टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका टीम इंडिया विरुद्ध दुसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. दोन्ही संघांनी सामन्याआधी जोरदार सराव केला आहे.

IND vs SA 2nd Test : भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा आणि अंतिम सामना गुवाहाटीत, किती वाजता सुरुवात होणार?
India vs South Africa 2nd Test Live Streaming
Image Credit source: @ProteasMenCSA
| Updated on: Nov 21, 2025 | 9:59 PM

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात भारत दौऱ्याची सरस सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेने यजमान भारताला कोलकातातील इडन गार्डन्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसरा आणि अंतिम सामना हा भारतासाठी करो या मरो असा झाला आहे. भारताला मालिका पराभव टाळण्यासाठी दुसरा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना गुवाहाटीतील बारसापरा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्याला सकाळी 9 वाजता सुरुवात होईल. तर 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना मोबाईलवर लाईव्ह कुठे पाहता येईल?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना मोबाईलवर जियोहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

दक्षिण आफ्रिका भारतावर वरचढ

दुसऱ्या कसोटीत टेम्बा बावुमा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याऐवजी उपकर्णधार ऋषभ पंत भारताच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 45 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने या 45 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने 19 सामने जिंकले आहेत. तर भारताने 16 सामन्यांमध्ये पलटवार केला आहे. तर उभयसंघातील 10 सामने हे अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे आता टीम इंडिया दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात विजय मिळवत पहिल्या पराभवाची वसुली करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.