IND vs SA: पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया जाणार? असा आहे सेंच्युरियनचा वेदर रिपोर्ट

| Updated on: Dec 26, 2021 | 12:01 PM

भारतीय संघातील खेळाडू पहिल्या सामन्याची तयारी करत असताना क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.

IND vs SA: पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया जाणार? असा आहे सेंच्युरियनचा वेदर रिपोर्ट
Follow us on

सेंच्युरियन: सेंच्युरियनवर (Centurion) आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IndvsSA) पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिल्या दिवसापासून दमदार सुरुवात करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. दक्षिण आफ्रिकेत पहिला कसोटी मालिका विजय मिळवण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. विराटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 29 वर्षात जे शक्य झालं नाही, ते साध्य करुन दाखवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

भारतीय संघातील खेळाडू पहिल्या सामन्याची तयारी करत असताना क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळात पाऊस व्यत्यय आणण्याची शक्यता आहे. सेंच्युरियनच्या वेदर फोरकास्टनुसार, आज पाऊस पडण्याची शक्यता 60 टक्के आहे. दिवस पुढे सरकेल, तसं ढगाळ वातावरण राहणार नाही. याचाच अर्थ पहिल्या सत्राचा खेळ विलंबाने सुरु होऊ शकतो. सोमवारी सुद्धा वातावरण असेच राहू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत पाऊस अधून-मधून व्यत्यय आणू शकतो.

अशा प्रकारच्या वातावरणात वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची राहील. त्यांना खेळपट्टीकडून चांगली साथ मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज नॉर्टजी दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेत खेळणार नाहीय. ही भारतासाठी दिलासादायक बाब आहे. वेगवान गोलंदाजीत भारताची मदार जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज यांच्यावर अवलंबून आहे. या तिघांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यात आपली छाप उमटवली होती. दक्षिण आफ्रिकेतही हे तिन्ही गोलंदाज निर्णायक ठरतील.

संबंधित बातम्या: 

IND vs SA 1st Test: 29 वर्षानंतर इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल टीम इंडिया
Ind vs SA: कॅप्टन निवडणं माझं काम नाही, राहुल द्रविडने स्पष्ट केली भूमिका
IND vs SA: आपल्या कामगिरीने लोकांची तोंड बंद करा, झहीरचा अजिंक्य रहाणेला सल्ला