IND vs SL, 1st Odi : इशान किशनला डबल सेंच्युरी ठोकूनही ‘या’ खेळाडूसाठी पहिल्या सामन्यातून वगळलं

या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना गुवाहाटीत (Guwahati) खेळवण्यात येणार आहे.

IND vs SL, 1st Odi : इशान किशनला डबल सेंच्युरी ठोकूनही 'या' खेळाडूसाठी पहिल्या सामन्यातून वगळलं
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 11:17 PM

गुवाहाटी : टीम इंडिया इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND v SL Odi Series) यांच्यात मंगळवारी 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना गुवाहाटीत (Guwahati) खेळवण्यात येणार आहे. या पहिल्या सामन्यातून इशान किशनला (Ishan Kishan) प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं आहे. याबाबतची माहिती कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) दिली आहे. एकदिवसीय मालिकेच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने ही माहिती दिली. रोहितच्या या निर्णयामुळे नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. (ind vs sl 1st odi shubhaman gill will open against sri lanka ishan kishan not given chance in playing eleven captain rohit sharma confirm)

रोहित काय म्हणाला?

“इशानला बाहेर ठेवणं हा निर्णय फारच दुर्देवी आहे. मात्र शुबमन गिलला पूर्ण आणि योग्य संधी द्यायची आहे”, असं रोहितने म्हटलं. इशानने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात द्विशतकी खेळी केली होती. इशानने 210 धावांची वादळी खेळी केली होती यामध्ये 10 सिक्स आणि 24 चौकारांचा समावेश होता.

शुबमनला संधी देण्यात आल्याने आता रोहित त्याच्यासोबत ओपनिंग करु शकतो. गिलची एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी राहिली आहे. गिलने 2022 मध्ये 12 सामन्यांमध्ये 70.88 च्या सरासरीने 638 धावा केल्या. यामध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

दिग्ग्जांचं संघात कमबॅक

या एकदिवसीय मालिकेच्या निमित्ताने टीम इंडियात अनुभवी खेळाडूचं कमबॅक झालंय. टीममध्ये विराट कोहली परतलाय. तसेच कर्णधार रोहितचंही पुनरागमन झालंय. केएल राहुललाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार आहे. याच कारणामुळे इशानला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावं लागलंय.

केएल ओपनिगंला येणार?

इशानला संघात स्थान न दिल्याने केएल राहुलच विकेटकीपरची जबाबदारीबी पार पाडेल. बांगलादेश दौऱ्यावर केएल फ्लॉप ठरला होता. केएलला गेल्या 6 डावांमध्ये एकही अर्धशतक लगावता आलेलं नाही.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.

टीम श्रीलंका : दसुन शनाका (कर्णधार), कुशल मेंडिस (उपकर्णधार), पथुम निशांका, अविश्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमे, चरिथ असालंका, धनंजय डि सिल्वा, आशेन बांद्रा, महीष तिक्षाणा, जेफरी वेंडरसे, चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसुन रजिथा, नुवांदु फर्नांडो, दुनिथ वेल्लागे, प्रमोद मुधशन आणि लाहिरु कुमारा.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.