IND vs SL 2nd ODI : श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय, प्लेइंग इलेव्हनबाबत जाणून घ्या
भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा वनडे सामना आज होत आहे. या सामन्यापूर्वीच श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे उर्वरित दोन सामन्यांना मुकला आहे. त्यामुळे श्रीलंकेसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा वनडे सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला. कर्णधार चरीथ असलंकाने क्षणाचाही विलंब न करता प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मागच्या सामन्यात टॉस जिंकत श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी केली होती. तसेच श्रीलंकेने दिलेल्या 230 धावा करणंही कठीण झालं. अवघी 1 धाव आवश्यक असताना दोन गडी गमावले. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. तीन सामन्यांची मालिका असल्याने दुसऱ्या सामन्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. आता या सामन्यात कोण आघाडी घेतं याची उत्सुकता लागून आहे. दरम्यान, भारताने श्रीलंकेविरुद्धचा आजचा सामना जिंकला तर शतक पूर्ण होणार आहे. भारताने आतापर्यंत श्रीलंकेविरुद्ध 99 सामने जिंकले आहेत.
कर्णधार रोहित शर्माने सांगितलं की, ‘ हे ठीक आहे पुन्हा पाठलाग करावा लागतोय. जेव्हा आपण पाठलाग करतो तेव्हा काय अपेक्षा करावी हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही नेहमी त्याच मानसिकतेने आणि त्याच पद्धतीने खेळू शकत नाही. तुम्हाला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल आणि मग मुक्तपणे खेळावे लागेल. आम्हाला एक संघ म्हणून करायचे आहे. तीच प्लेइंग इलेव्हन असेल. दोन्ही संघ चांगले खेळले, निकाल बाजूने न जाणे त्या सामन्यासाठी योग्य होते.’
श्रीलंकेचा कर्णधार चरीथ असलंका याने सांगितलं की, आम्ही प्रथम फलंदाजी करू. मला असे वाटते, खेळपट्टी इतर दिवसांसारखीच दिसते. या खेळासाठी कर्णधार म्हणून फारसे वेगळे नाही. हसरंगा आणि शिराज ऐवजी संघात कामिंदू आणि वांडरसे यांना संघात स्थान दिलं आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग