AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL 3rd T20: टीम इंडियाचा श्रीलंकेवर मोठा विजय, सीरीजमध्ये झाले ‘हे’ 8 मोठे रेकॉर्ड्स

IND vs SL 3rd T20: श्रीलंकन टीम पुन्हा एकदा T20 सीरीजमध्ये भारतात सीरीज जिंकण्यात अपयशी ठरली. फक्त T20 च नाही, श्रीलंका कुठल्याही फॉर्मेटमध्ये कधीच भारतात भारताविरुद्ध सीरीज जिंकू शकलेली नाही.

IND vs SL 3rd T20:  टीम इंडियाचा श्रीलंकेवर मोठा विजय, सीरीजमध्ये झाले 'हे' 8 मोठे रेकॉर्ड्स
team indiaImage Credit source: BCCI
| Updated on: Jan 08, 2023 | 7:48 AM
Share

राजकोट: टीम इंडिया आणि श्रीलंकेत काल T20 सीरीजचा शेवटचा सामना झाला. दोन वर्षात सलग दुसरी T20 सीरीज आणि निकाल तोच. तीन T20 सीरीजच्या शेवटच्या सामन्यात काल भारताने श्रीलंकेवर 91 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने ही सीरीज 2-1 अशी जिंकली. नेहमीप्रमाणे टीम इंडियाने फक्त सीरीज जिंकली नाही, तर त्यांनी काही रेकॉर्डही आपल्या नावावर केले.

शनिवारी राजकोटमध्ये भारताने  पहिली बॅटिंग केली. सूर्यकुमार यादवच्या 112 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने 228 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा डाव 137 धावात ढेपाळला. मॅचसोबत सीरीजही भारताने जिंकली. या सीरीजमधले काही खास रेकॉर्ड आणि आकडे जाणून घ्या.

– भारताने सलग पाचव्यांदा श्रीलंकेला आपल्या भूमीवर T20 सीरीजमध्ये हरवलय. दोन्ही टीम्समध्ये आतापर्यंत भारतामध्ये 6 T20 सीरीज झाल्यात. 2009 साली खेळली गेलेली पहिली सीरीज 1-1 अशी बरोबरीत होती. म्हणजे श्रीलंकेची टीम अजूनपर्यंत भारताला भारतात हरवू शकलेली नाही.

– तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून श्रीलंकेची टीम भारतात आतापर्यंत 25 द्विपक्षीय सीरीज खेळली आहे. पण एकाही सीरीजमध्ये श्रीलंकेला विजय मिळवता आलेला नाही. भारत एकमेव देश आहे, जिथे श्रीलंकेला तिन्ही फॉर्मेटमध्ये अजूनपर्यंत यश मिळवता आलेलं नाही.

– टीम इंडियाने 2019 पासून मायदेशात एकही T20 सीरीज गमावलेली नाही. तोच रेकॉर्ड भारताने कायम ठेवला आहे. 2019 पासून भारतात टीम इंडियाने 12 सीरीज खेळल्यात. त्यात 10 मध्ये विजय मिळवलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सीरीज ड्रॉ झाल्या.

– टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध टी 20 मध्ये चौथ्यांदा एकाडावात 200 पेक्षा जास्त धावा केल्यात. याआधी टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध 4 वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्यात.

– मायदेशात टीम इंडियाचा हा दुसरा मोठा विजय आहे. टीम इंडियाने मायदेशात 93 धावांनी मोठा विजय मिळवलाय. योगायोग म्हणजे 2017 साली श्रीलंकेविरुद्ध हा विजय मिळवला होता.

– सूर्यकुमार यादवने T20 मध्ये तिसर शतक फटकावलं. रोहित शर्माच्या नावावर T20 मध्ये चार शतकं आहेत. सूर्यकुमार T20 मध्ये अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय आहे. – सूर्यकुमारने फक्त 45 चेंडूत शतक पूर्ण केलं. रोहित शर्मानंतर भारतासाठी झळकवलेला हे दुसरं वेगवान शतक आहे. रोहितने 35 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं.

– सूर्याने या इनिंगमध्ये 1500 धावा पूर्ण केल्या. 843 चेंडूमध्ये सूर्याने ही करामत केली.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.