AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला कर्णधार

रोहित शर्माने कर्णधार म्हणून आणखी मानाचं स्थान मिळवलं आहे. अर्धशतकी खेळीसह रोहित शर्माने मोठी कामगिरी केली आहे. श्रीलंकेविरुद्ध तीन षटकार मारताच त्याच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेला आहे.

रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला कर्णधार
Image Credit source: BCCI
| Updated on: Aug 02, 2024 | 8:09 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माचा झंझावात पाहायला मिळाला. श्रीलंकेच्या गोलंदाजांवर तुटून पडला. खेळपट्टी फिरकीला मदत करणारी असून रोहित शर्माने अनुभवाच्या जोरावर खेळी केली. इतकंच काय पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून आपला हेतूही स्पष्ट केला. रोहित शर्माने 33 चेंडूत 53 धावांची खेळी केली. तसेच पहिल्या 10 षटकात अर्धशतक झळकावण्याची ही त्याची तिसरी वेळ आहे. रोहित शर्माने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान तीन षटकार ठोकला आणि त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. रोहित शर्माने कर्णधार म्हणून 234 षटकारांचा टप्पा गाठला आहे. त्याने इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनला मागे टाकत आता पहिलं स्थान पटकावलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नावावर सर्वाधिक षटकारांची नोंद होती. त्याच्या नावावर 233 षटकार होते. कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध 3 षटकार मारताच हा विक्रम आता त्याच्या नावावर झाला आहे. रोहित शर्माच्या नावावर आता 234 षटकार झाले आहेत. रोहित शर्माने आतापर्यंत 124 आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. यात कसोटीत त्याने 21, वनडेत 108 आणि टी20 क्रिकेटमध्ये 105 षटकार मारले आहेत. तिसऱ्या स्थानावर महेंद्रसिंह धोनी असून त्याच्या नावावर 211 षटकार आहेत. चौथ्या स्थानावर रिकी पाँटिंग असून त्याच्या नावावर 171 आणि ब्रँडन मॅक्युलमच्या नावावर 170 षटकार आहेत.

रोहित शर्माने वनडे कारकिर्दिची सुरुवात 2007 साली केली होती. आतापर्यंत रोहित शर्मा 263 वनडे सामने खेळला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या 58 धावा पकडल्या तर त्याने आतापर्यंत 10767 धावा केल्या आहेत. यात 31 शतकांचा समावेश आहे. दरम्यान, श्रीलंकेने भारतासमोर 50 षटकात विजयासाठी 230 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराज.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.