AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind Vs SL : टीम इंडियाला मोठा झटका, स्टार बॅट्समन माालिकेतून ‘आऊट’

श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्याआधी (IND vs SL T20I) टीम इंडियात मोठा बदल करण्यात आला आहे.

Ind Vs SL : टीम इंडियाला मोठा झटका, स्टार बॅट्समन माालिकेतून 'आऊट'
Image Credit source: बीसीसीआय
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jan 05, 2023 | 1:28 AM
Share

पुणे : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. दुसरा सामना गुरुवारी 5 जानेवारी पुण्यात पार पडणार आहे. याआधी मोठी अपडेट समोर आली आहे. शेवटच्या 2 सामन्यांसाठी टीम इंडियात एक मोठा बदल करण्यात आला आहे. संजू सॅमसन टीममधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी महाराष्ट्रातील विकेटकीपर बॅट्समन जितेश शर्माला संधी देण्यात आली आहे. (ind vs sl t20i sanju Samson ruled out of remainder series vidarbha player jiten sharma get chance in team india)

संजूला मुंबईत झालेल्या पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती. संजूला कॅच पकडताना गुडघ्याला दुखापत झाली. संजूला या दुखापतीमुळे टीम इंडियासोबत दुसऱ्या सामन्यासाठी पुण्यालाही जाता आलं नाही. टीम इंडियात हा बदल दुसऱ्या सामन्याच्या 24 तासांआधीच घेण्यात आला आहे.

जितेश शर्मा कोण आहे?

जितेश शर्मा रणजी ट्रॉफीत विदर्भासाठी खेळतो. जितेश आयपीएलमध्ये पंजाब किंग्ससाठी खेळला आहे. आता जितेशला टीम इंडियात संधी मिळाली आहे. जितेशने गेल्या काही काळात स्वत:ला एक परफेक्ट फिनीशर म्हणून सिद्ध केलय. त्यामुळे जितेशला दुसऱ्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं प्रामुख्याने विदर्भाचं लक्ष असणार आहे

टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया : हार्दिक पांड्या (कप्तान), ईशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी आणि जितेश कुमार.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,