IND vs WI | ‘तो’ तितकाच टॅलेंटेड पण बॅटिंगमध्ये तिघांपेक्षा कमी पडतो, म्हणून आज टेस्ट टीममध्ये नाही
IND vs WI | वेस्ट इंडिज विरुद्ध संपूर्ण टेस्ट सीरीजमध्ये 'हा' दिग्गज प्लेयर खेळणार नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. प्रत्येकवेळी संधी मिळाल्यानंतर त्याने स्वत:ला सिद्ध केलय.

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये 2 कसोटी सामन्यांची सीरीज होणार आहे. बुधवारी 12 जुलैला डॉमिनिकामध्ये संध्याकाळी 7.30 वाजता टेस्ट सीरीज सुरु होईल. वेस्ट इंडिज विरुद्धच्या या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा एक दिग्गज खेळाडू खेळणार नाहीय. भारतीय क्रिकेटच कंट्रोल बोर्डाने 2 मॅचच्या टेस्ट सीरीजसाठी चायनामन गोलंदाज कुलदीप यादवची निवड केलेली नाही.
कुलदीप यादवच्या चाहत्यांना ही निराश करणारी बातमी आहे. कुलदीप यादव दोन्ही कसोटीत खेळणार नाहीय. मागच्या 6 वर्षात कुलदीप यादव भारतासाठी फक्त 8 कसोटी सामने खेळलाय. टीम इंडियासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करुनही त्याला कसोटी टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. सतत त्याचं टीमच्या आत-बाहेर सुरु असतं.
अन्य तिघांच्या तुलनेत तो बॅटिंगमध्ये कमी पडतो
वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दिग्गज ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि लेफ्ट आर्म स्पिनर ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाची टीममध्ये निवड करण्यात आली आहे. अक्षर पटेलही टीममध्ये आहे. पण त्याला दोन कसोटींसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. जाडेजा, अश्विन आणि अक्षर पटेल फिरकी गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही माहीर आहेत. कुलदीप यादव अन्य तिघांच्या तुलनेत बॅटिंगमध्ये मागे पडतो.
टेस्टमध्ये त्याचा रेकॉर्ड काय?
कुलदीप यादव भारतासाठी 8 कसोटी सामने खेळलाय. त्याने 34 विकेट घेतलेत. यात 3 वेळा पाच विकेट काढलेत. इतका चांगला रेक़र्ड असूनही कुलदीप यादवला अश्विन आणि जाडेजा असल्याने त्याला टीम इंडियात स्थान मिळत नाही. दोघे वेस्ट इंडिजची वाट लावण्यास सक्षम
वेस्ट इंडिज विरुद्ध 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा टीम इंडियाकडून 7 व्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरेल. तो चेंडू सोबत बॅटने सुद्धा टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करेल. डॉमिनिकाची पीच फिरकी गोलंदाजीला अनुकूल राहील. कॅप्टन रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये अश्विन आणि जाडेजा दोघांना संधी देईल. बॉलिंग बरोबर दोघे बॅटिंगही उपयुक्त करु शकतात. हे दोन्ही स्पिनर्स वेस्ट इंडिजची वाट लावण्यास सक्षम आहेत.
