IND vs WI : दुसऱ्या कसोटीमध्ये बदलणार प्लेइंग 11, दोन खेळाडूंना मिळणार डच्चू?

Rohit Sharma on Playing XI in Second Test : टीम इंडियाच्या दुसरा सामन्यामध्ये संघाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल करणार असल्याची माहिती समजत आहे. याबाबत कर्णधार रोहित शर्मानेही स्पष्टपणे सांगितलं आहे.

IND vs WI : दुसऱ्या कसोटीमध्ये बदलणार प्लेइंग 11, दोन खेळाडूंना मिळणार डच्चू?
| Updated on: Jul 17, 2023 | 8:02 PM

मुंबई : टीम इंडियाने पहिला कसोटी सामना अवघ्या तीन दिवसांमध्ये जिंकला. एक डाव आणि 144 धावांनी टीम इंडियाने वेस्ट इंजिजवर विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यात इंडिज संघाला विजय मिळवावाच लागणार आहे. कारण त्यांच्यासाठी हा सामना गमावणं म्हणजे मालिका गमावल्यासारखं आहे. दुसरीकडे  दुसरा सामन्यामध्ये पुन्हा टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होणार असल्याची माहिती समजत आहे. याबाबत कर्णधार रोहित शर्मानेही स्पष्टपणे सांगितलं आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियामध्ये बदल होऊ शकतो. याबाबत रोहित शर्मा म्हणाला की, संघामध्ये दोन खेळाडू असे आहेत ज्यांना कसोटी क्रिकेटमध्ये अजून संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्या खेळाडूंना संधी म्हणून आम्ही मैदानामध्ये उतरवू शकतो.

रोहित शर्मा काय म्हणाला?

डॉमिनिकामध्ये पहिली कसोटी जिंकल्यानंतर दुसराही सामना जिंकायचाच आहे. परंतू पुढच्या कसोटीमध्ये आम्ही दोन खेळाडूंना खेळवू शकतो, असं रोहित शर्मा म्हणाला आहे. मात्र रोहितने नेमके ते दोन खेळाडू कोण आहेत याबाबत काही सांगितलं नाही. त्यासोबतच त्या दोन खेळाडूंची नावेही समोर नाही आलीत. त्यामुळे ते खेळाडू कोण याबाबत अद्याप उत्सुकता लागली आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील दुसरा कसोटी सामना 20 जुलैला सुरू होणार आहे. पोर्ट ऑफ स्पेन या ठिकाणी हा सामना पार पडला जाणार आहे. पहिल्या कसोटीमध्ये भारताने 5 गोलंदाज आमि 6 फलंदाज ठेवले होते. मात्र आता दुसऱ्या कसोटीमध्ये संघात काही नवीन चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा (C), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (W), इशान किशन (W), रविचंद्रन अश्विन, रवींद्रन. जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.