IND vs WI : यशस्वी जयस्वाल याच्या अर्धशतकी खेळीनंतर राहुल द्रविड याची अशी प्रतिक्रिया, Watch Video

यशस्वी जयस्वाल याने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावलं. त्याची खेळी पाहून क्रीडाप्रेमींनी भारतीय क्रिकेटचं भवितव्य असा उल्लेख केला आहे.

IND vs WI : यशस्वी जयस्वाल याच्या अर्धशतकी खेळीनंतर राहुल द्रविड याची अशी प्रतिक्रिया, Watch Video
IND vs WI : पदार्पणाच्या सामन्यात यशस्वी जयस्वालची अर्धशतकी खेळी आणि राहुल द्रविडने केलं असं काही...
| Updated on: Jul 13, 2023 | 9:48 PM

मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात यशस्वी जयस्वाल याने साजेशी कामगिरी केली. कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत शतकी भागीदारी करत निवड योग्य असल्याचं सिद्ध केलं आहे. तसेच कसोटी क्रिकेटमधील पहिलं अर्धशतकं झळकावलं. श्रेयस अय्यरनंतर पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे. यशस्वी जयस्वाल याने 104 चेंडूचा सामना करत 50 धावा पूर्ण केल्या. यात त्याने एकूण 7 चौकार मारले. अर्धशतकी खेळीसह यशस्वी जयस्वालच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कसोटी पदार्पणात अर्धशतक करणारा आठवा भारतीय सलामीवीर आहे. यापूर्वी पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, शिखर धवन, अरुण लाल, सुनील गावसकर, केसी इब्राहीम आणि दिलवार हुसैन या सात भारतीयांनी केली आहे.

त्याच्या या कामगिरीनंतर पॅव्हेलियनमधील सहकाऱ्यांनी त्याचं उभं राहून राहून अभिनंदन केलं. प्रशिक्षक राहुल द्रविड याने यशस्वी जयस्वालचं टाळ्या वाजवून कौतुक केलं. त्याला रवींद्र जडेजा आणि विराट कोहली यांचीही साथ मिळाली. बीसीसीआयनेही ट्वीट करून यशस्वी जयस्वाल याचं कौतुक केलं आहे.

यशस्वी जयस्वाल याच्यासोबत कर्णधार रोहित शर्मा यानेही अर्धशतकी खेळी केली. कसोटी कारकिर्दीतील 15 वं अर्धशतक आह. या अर्धशतकासह रोहित शर्मा याने कसोटीत 3500 धावा पूर्ण केल्या आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनरिन चंद्रपॉल, रेमॉन रेफर, जर्मिन ब्लॅकवूड, एलिक एथानझे, जोशुआ डासिल्वा, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमर रोच आणि जोमे वॉरिकन.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) , यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रविंद्र जडेजा, इशान किशन, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.