Ind Vs WI, Shikhar Dhawan : शिखरच्या नेतृत्वात इंडिजविरुद्ध विजय, धवन याबाबतीत ठरला भारताचा पाचवा विजयी कर्णधार

सौरव गांगुलीने वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली आहे. विराट आणि गांगुली व्यतिरिक्त एमएस धोनी आणि सुरेश रैना यांनीही कर्णधार म्हणून वेस्ट इंडिजच्या भूमीवर एकदिवसीय मालिका जिंकली आहे.

Ind Vs WI, Shikhar Dhawan : शिखरच्या नेतृत्वात इंडिजविरुद्ध विजय, धवन याबाबतीत ठरला भारताचा पाचवा विजयी कर्णधार
एमएस धोनी, विराट कोहली, शिखर धवन
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 25, 2022 | 9:08 AM

नवी दिल्ली :  पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा (IND vs WI) 2 गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजवर (WI) भारताचा हा सलग 12वा मालिका विजय आहे. हा विजय शिखर धवनच्या नेतृत्वात झालाय. कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिज दौऱ्यावर शिखर धवन (Shikhar Dhawan) टीम इंडियाचा कर्णधार आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी त्याची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा पराभव केला. कॅरेबियन भूमीवर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्यात यश मिळवणारा तो भारताचा पाचवा कर्णधार ठरला आहे. वेस्ट इंडिजमध्ये भारताने आतापर्यंत फक्त काही एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. मात्र, दोनदा एकट्या विराट कोहलीने कॅरेबियन भूमीवर एकदिवसीय मालिका जिंकली आहे.

सौरव गांगुलीने वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली आहे. विराट आणि गांगुली व्यतिरिक्त एमएस धोनी आणि सुरेश रैना यांनीही कर्णधार म्हणून वेस्ट इंडिजच्या भूमीवर एकदिवसीय मालिका जिंकली आहे. आता यात शिखर धवनच्या नावाचाही समावेश झाला आहे.

वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय मालिका जिंकणारे कर्णधार

  1. 2 वेळा – विराट कोहली
  2. 1 वेळा – एमएस धोनी
  3. 1 वेळा – सौरव गांगुली
  4. 1 वेळा – सुरेश रैना
  5. 1 वेळा शिखर धवन

दोन्ही सामने रोमांचक शैलीत जिंकले

भारतीय क्रिकेट संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने रोमांचकारी पद्धतीनं जिंकले आहेत.वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना चौकार मारता न आल्याने भारताने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मालिकेतील पहिला वनडे सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला. त्याचवेळी भारताने 50 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार मारून दुसरा एकदिवसीय सामना जिंकला.अशा प्रकारे भारताने दोन्ही सामने रोमांचकारी पद्धतीने जिंकले.

बीसीसीआयचं ट्विट

सामन्यात काय झालं?

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रेयस-संजूनेही अर्धशतक झळकावले आणि विंडीज संघाने 50 षटकांत 6 गडी गमावून 311 धावा केल्या. शाई होपनं कारकिर्दीतील 100 वा वनडे खेळताना 115 धावा केल्या. निकोलस पूरनने कर्णधारपदी 74 धावांची खेळी खेळली. भारताकडून शार्दुल ठाकूरनं सर्वाधिक तीन बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि आवेश खान विकेट घेण्यात अपयशी ठरले.

आवेशचा हा डेब्यू वनडे होता आणि तो चांगलाच महागात पडला. त्याने 6 षटकात 54 धावा दिल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियानं 49.4 षटकांत 8 गडी गमावून विजयाचं लक्ष्य गाठलं. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर (63), संजू सॅमसन (54) आणि शुभमन गिलने 43 धावा केल्या.