IND vs WI: Rohit Sharma च्या दुखापतीबद्दल महत्त्वाची अपडेट, टी 20 सीरीज मधून बाहेर होणार? जाणून घ्या…

IND vs WI: भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सीरीज मधला पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये भारताचा पराभव झाला.

IND vs WI: Rohit Sharma च्या दुखापतीबद्दल महत्त्वाची अपडेट, टी 20 सीरीज मधून बाहेर होणार? जाणून घ्या...
rohit-sharma Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 2:09 PM

मुंबई: भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सीरीज मधला पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये भारताचा पराभव झाला. पुन्हा तिसरा सामना भारताने 7 विकेटने जिंकला. या विजया दरम्यान कॅप्टन रोहित शर्माला दुखापत झाली. रोहितच्या मागे कंबरेच दुखण लागलं. त्यानंतर त्याचा फिटनेस आणि पुढच्या काही सामन्यात उपलब्धतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आता त्याच्या फिटनेसद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

रोहित शर्मा शेवटच्या दोन टी20 सामन्यांसाठी फिट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिसऱ्या टी 20 सामन्यादरम्यान रोहितला कंबर दुखीचा जो त्रास झाला होता, तो गंभीर नाहीय. रोहित शर्मा आता त्यातून सावरला आहे. 6 ऑगस्टला होणाऱ्या टी 20 सामन्यात तो खेळताना दिसेल. अजूनही रोहितकडे आरामासाठी दोन दिवस आहेत. त्यामुळे रोहित सहजपणे पुढचा सामना खेळू शकतो. 7 ऑगस्टला वेस्ट इंडिज विरुद्ध पाचवा टी 20 सामना होणार आहे. हे दोन्ही सामने अमेरिकेत फ्लोरिडा मध्ये खेळले जाणार आहेत. कंबरेची दुखापत फारशी गंभीर नसल्याचं रोहितने तिसऱ्या टी 20 सामन्यानंतर सांगितलं होतं.

रोहित शर्माला आराम देण्याची गरज?

रोहित फिट असला, तरी त्याला चौथ्या टी 20 सामन्यासाठी आराम देण्याचा निर्णय होऊ शकतो. मागच्या काही वर्षात रोहित अनेकदा दुखापतग्रस्त झाला आहे. खासकरुन लोअर बॉडी मध्ये त्याला अनेकदा दुखापत झालीय. दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी सुद्धा त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. न्यूझीलंड विरुद्धही त्याला दुखापत झाली होती. लवकर पुनरागमन करण्याच्या नादात त्याला आणखी मोठी दुखापत होऊ शकते.

रोहितने विश्रांती घेतली तरी फरक पडणार नाही

भारतीय संघ सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. चौथ्या टी 20 सामन्यात रोहितने आराम केला, तरी फरक पडणार नाही. संघाच नेतृत्व करण्यासाठी भारताकडे पर्यायही उपलब्ध आहेत. रोहितला विश्रांती दिली, तर आणखी एका युवा खेळाडूची चाचणी करता येईल. टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेते? ते आता पहाव लागेल.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.