
आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान भिडणार आहेत. या स्पर्धेनंतर पुन्हा एकदा कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. टीम इंडिया मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी गुरुवारी 25 सप्टेंबरला भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. शुबमन गिल भारताचं नेतृत्व करणार आहे. तर दुखापतीमुळे ऋषभ पंत याला मालिकेला मुकावं लागलंय. पंतच्या अनुपस्थितीत रवींद्र जडेजा उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. उभयसंघातील कसोटी मालिकेचा थरार 2 ते 14 ऑक्टोबर दरम्यान रंगणार आहे. मात्र त्याआधी टीमला मोठा झटका लागला आहे. स्टार खेळाडूला कसोटी मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे.
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला सामना हा 2 ते 6 ऑक्टोबर दरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. त्याआधी विंडीजला मोठा झटका लागला आहे. विंडीजचा वेगवान गोलंदाज शामर जोसेफ याला दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. याबाबतची माहिती वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन देण्यात आली आहे.
“शामरला दुखापतीमुळे खेळता येणार नाही. शामरची बांगलादेश विरूद्धच्या मालिकेआधी फिटनेस टेस्ट होईल”, अशी माहिती विंडीज क्रिकेट बोर्डाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. विंडीज भारत दौऱ्यानंतर बांगलादेश दौऱ्यात वनडे आणि टी 20I मालिका खेळणार आहे. या मालिकेआधी शामरला फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे.
शामरने आतापर्यंत विंडीजचं 11 कसोटी सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचं प्रतिनिधित्व केलं आहे. शामरने 11 सामन्यांमध्ये एकूण 51 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 299 धावाही केल्या आहेत. शामरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करत साऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. मात्र आता त्याला दुखापतीमुळे त्याला पहिल्या सामन्याला मुकावं लागणार आहे. शामरच्या जागी संधी मिळालेल्या खेळाडूबाबत जाणून घेऊयात.
विंडीजला झटका, शामर जोसेफ मालिकेतून बाहेर
Squad Update 🚨
Johann Layne has replaced Shamar Joseph in the squad for the test series against India.
Joseph has been ruled out due to an injury and will be re-evaluated ahead of the Bangladesh limited overs series.#INDvsWI | #MenInMaroon pic.twitter.com/2z5uiZSicu
— Windies Cricket (@windiescricket) September 26, 2025
शामरच्या जागी संघात जोहान लेन याचा समावेश करण्यात आला आहे. शामरला झालेल्या दुखापतीमुळे जोहानचं आंतरराष्ट्रीय पदार्पण होऊ शकतं. जोहानने आतापर्यंत 19 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. जोहानने या 19 सामन्यांमधील 32 डावात 495 धावा केल्या आहेत. तसेच 66 विकेट्स मिळवल्या आहेत.
टीम इंडिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा सुधारित संघ : रॉस्टन चेस (कॅप्टन), जोमेल वार्रिकन (उपकर्णधार), केवलन एंडरसन, एलिक अथानाजे, जॉन कम्पबेल, टॅगनारायण चंद्रपॉल, जस्टिन ग्रीव्स, शाई होप, टेविन इमलाच, अल्झारी जोसेफ, जोहान लेन, ब्रँडन किंग, एंडरसन फिलिप, खारी पियरे आणि जेडन सील्स.