IND vs ZIM 3rd T20 : वर्ल्डकप संघातून आलेल्या संजू, जयस्वाल आणि दुबेला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी, शुबमनने कापला या तिघांचा पत्ता

टी20 मालिकेत झिम्बाब्वे विरुद्ध भारत हा तिसरा सामना आज होत आहे. या सामन्यात दिग्गज खेळाडूंचा भरणा टीम इंडियात झाला आहे. यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांचं संघात पुनरागमन झालं आहे. या तिघांना प्लेइंग 11 मध्ये जागा करून देण्यासाठी कोणाचा पत्ता कापला ते जाणून घेऊयात.

IND vs ZIM 3rd T20 :  वर्ल्डकप संघातून आलेल्या संजू, जयस्वाल आणि दुबेला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी, शुबमनने कापला या तिघांचा पत्ता
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 4:37 PM

भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्या पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने झाले असून 1-1 ने बरोबरी झाली आहे. असं असताना तिसऱ्या सामन्यात वर्ल्डकप संघात असलेले तीन खेळाडू आले आहेत. यात विकेटकीपर संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांचा समावेश आहे. त्यामुळे या तिघांना कोणाच्या जागेवर घेणार आणि कोणाला बसवणार हा प्रश्न होता. मात्र हा प्रश्न कर्णधार शुबमन गिल आणि टीम व्यवस्थापनाने सोडवला आहे. वर्ल्डकप विजेत्या संघातील तिघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं आहे. ध्रुव जुरेल, रियान पराग यांना आराम दिला आहे. दुसरीकडे, साई सुदर्शन मायदेशी परतल्याने एक जागा रिकामी झाली होती. तर खलील अहमद हा मुकेश कुमारच्या जागी आला आहे. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा पाहता झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची भंबेरी उडणार यात शंका नाही. नवव्या स्थानापर्यंत फलंदाजी एकदम स्ट्राँग असल्याचं दिसून येत आहे.

रियान परागला पहिल्या सामन्यात स्थान मिळालं होतं. मात्र काही खास करू शकला नव्हता. 3 चेंडूत 2 धावा करून बाद झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात त्याच्या वाटेला फलंदाजी आलीच नाही. अभिषेक शर्मा पहिल्या सामन्यात खातं न खोलता बाद झाला होता. त्यानंतर जबरदस्त कमबॅक करून शतक ठोकलं. त्यामुळे त्याची जागा जाणं खूपच कठीण होतं. दुसरीकडे, पहिल्या सामन्यात फेल ठरलेला रिंकु सिंह देखील दुसऱ्या सामन्यात चमकला होता. त्यामुळे या तिघांना कुठे बसवायचा हा प्रश्न होता. साई सुदर्शन दोन सामन्यांसाठीच संघात होता. त्यामुळे एक जागा रिकामी झाली. तर रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांना बसवून दोन जागा करण्यात आल्या. तर मुकेश कुमारला आराम देऊन दुसऱ्या सामन्यात बेंचवर बसवलेल्या खलील अहमदला संधी दिली आहे. खलील अहमद पहिल्या सामन्यात महागडा ठरला होता.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): तादिवानाशे मारुमणी, वेस्ली मधवेरे, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जॉनथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा

Non Stop LIVE Update
नागपुरात तुफान पावसाची बॅटिंग, कोणत्या जिल्ह्याला पाऊस झोडपणार?
नागपुरात तुफान पावसाची बॅटिंग, कोणत्या जिल्ह्याला पाऊस झोडपणार?.
रत्नागिरीत तुफान पाऊस, 'जगबुडी'चं पाणी रस्त्यावर, गावांचा संपर्क तुटला
रत्नागिरीत तुफान पाऊस, 'जगबुडी'चं पाणी रस्त्यावर, गावांचा संपर्क तुटला.
भिवंडीला पावसानं झोडपलं, हा रस्ता की नदी..., ‘या’ भागात गुडघाभर पाणी
भिवंडीला पावसानं झोडपलं, हा रस्ता की नदी..., ‘या’ भागात गुडघाभर पाणी.
लाडकी बहीण-भाऊ योजनेनंतर आता 'लाडकी मेव्हणी'ची तयारी..जरांगेंकडून टीका
लाडकी बहीण-भाऊ योजनेनंतर आता 'लाडकी मेव्हणी'ची तयारी..जरांगेंकडून टीका.
मुंबईत समुद्र खवळला... उंच लाटा, पाऊस वाढला तर मुंबईची होणार तुंबई
मुंबईत समुद्र खवळला... उंच लाटा, पाऊस वाढला तर मुंबईची होणार तुंबई.
कोकणातील चाकरमान्यांची गैरसोय नको म्हणून 'मरे'चा निर्णय, उद्यापासून...
कोकणातील चाकरमान्यांची गैरसोय नको म्हणून 'मरे'चा निर्णय, उद्यापासून....
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादांचं गुलाबी कॅम्पेन? विरोधकांची हल्लाबोल
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादांचं गुलाबी कॅम्पेन? विरोधकांची हल्लाबोल.
भाजप कोअर बैठकीत अजितदादा अन् शिंदेंवर नाराजी? मदत न केल्याचा सूर?
भाजप कोअर बैठकीत अजितदादा अन् शिंदेंवर नाराजी? मदत न केल्याचा सूर?.
कलेक्टरिन बाईंचं पद धोक्यात? पूजा खेडकर यांना UPSC ची थेट नोटीस
कलेक्टरिन बाईंचं पद धोक्यात? पूजा खेडकर यांना UPSC ची थेट नोटीस.
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?.