IND vs ZIM: कुलदीप यादवला सतावतेय धोनीची आठवण, दिग्गज खेळाडूने सांगितलं कारण….

IND vs ZIM: यजमान झिम्बाब्वेचा डाव 189 धावात आटोपला. यजमान संघाचा कुठलाही खेळाडू 40 धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. संघासाठी सर्वाधिक धावा झिम्बाब्वेच्या कर्णधाराने केल्या.

IND vs ZIM: कुलदीप यादवला सतावतेय धोनीची आठवण, दिग्गज खेळाडूने सांगितलं कारण....
Kuldeep-yadav
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 19, 2022 | 12:47 PM

मुंबई: भारतीय संघाने (Team india) हरार मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध (IND vs ZIM) पहिला वनडे सामना सहजतेने जिंकला. टीमने 10 विकेटने विजय मिळवून सीरीज मध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आपला जलवा दाखवला. त्यामुळे यजमान झिम्बाब्वेचा डाव 189 धावात आटोपला. यजमान संघाचा कुठलाही खेळाडू 40 धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. संघासाठी सर्वाधिक धावा झिम्बाब्वेच्या कर्णधाराने केल्या.

कुलदीप यादवची झोळी रिकामी

झिम्बाब्वेचा संघ टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. फक्त 40.3 षटकात 189 धावात झिम्बाब्वेचा डाव आटोपला. भारतासाठी कमबॅक करणाऱ्या दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजलाही एक विकेट मिळाला. पण कुलदीप यादवच्या पदरात एकही विकेट पडला नाही. त्याने किफायती गोलंदाजी केली. 10 षटकात फक्त 36 धावा दिल्या. माजी भारतीय क्रिकेटपटू लक्ष्मण सिवारामकृष्णन यांनी कुलदीपचा बचाव केला व त्याच्यावर दबाव असल्याचं सांगितलं.

कुलदीप यादव वर दबाव होता

“कुलदीप यादव कमबॅक करत होता. त्याने सेफ खेळण्याचा प्रयत्न केला. कारण त्याला तिन्ही वनडे मध्ये खेळायचं आहे. त्याने सर्तक गोलंदाजी केली. तो एकाच लाइन मध्ये गोलंदाजी करेल, अशी अपेक्षा आहे. त्याच्या गुगली आणि लेग ब्रेकने फलंदाज हैराण होतात” असं सिवारामाकृष्णन म्हणाले.

हे सुद्धा वाचा

धोनी कुलदीप यादवची मदत करायचा

कुलदीप यादवने अनेकदा आपल्या शानदार प्रदर्शनाच श्रेय एमएस धोनीला दिलय. धोनी यष्टीपाठून कुलदीपला मदत करायचा. “धोनी चालाक होता. एका चांगल्या विकेटकीपरमुळे फरक पडतो. एखादा फलंदाज बॅकफुटवर खेळत असेल, तर विकेटकीपर त्या गोलंदाजाला फुल लेंथ टाकायला सांगतो. असा सल्ला देण्यासाठी धोनी योग्य खेळाडू होता” असे सिवारामकृष्णन म्हणाले. धोनी फलंदाजाला ओळखायचा. तो गोलंदाजाला तसाच सल्ला द्यायचा. यष्टीपाठी राहून धोनी चहल-कुलदीपला सल्ला द्यायचा.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें