
इंडिया ए टीमने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या अनऑफीशियल वनडे सीरिजची धमाक्यात सुरुवात केली. भारताने 1 सप्टेंबरला झालेल्या सामन्यात कांगारुंचा 171 धावांनी धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. भारताने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. प्रियांश आर्य आणि श्रेयस अय्यर या जोडीने पहिल्या सामन्यात धमाकेदार शतक ठोकलं होतं. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही भारतीय चाहत्यांना श्रेयसकडून अशाच तडाखेदार खेळीची आशा होती. तसेच आशिया कप 2025 फायनलनंतर सीनिअर टीममधील अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा हे खेळाडू ए संघासह जोडले गेले. त्यामुळे कांगारु विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात बिग शो पाहायला मिळेल, असा अंदाज चाहत्यांचा होता. मात्र अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर या दोघांनी चाहत्यांची निराशा केली.
अभिषेक शर्मा याने टी 20i आशिया कप स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम केला. त्यामुळे अभिषेक त्याच तडाख्याने कांगारुंविरुद्ध खेळेल, असं प्रत्येक भारतीय चाहत्याला अपेक्षित होतं. मात्र अभिषेक कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियममधील आयोजित दुसऱ्या सामन्यात गोल्डन डक ठरला. अर्थात अभिषेक पहिल्याच बॉलवर आऊट झाला. तर श्रेयस अय्यर याला दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या भारताची निराशाजनक सुरुवात झाली. अभिषेक शर्मा ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरला. अभिषेक डावातील पहिल्याच बॉलवर कॅच आऊट झाला. जॅक एडवर्ड्सने अभिषेकला आऊट केलं.
अभिषेकने आशिया कप 2025 स्पर्धेतील 7 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांसह 44.85 च्या सरासरीने 314 धावा केल्या होत्या. अभिषेकला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
अभिषेकनंतर भारताने 6 धावेवर दुसरी विकेट गमावली. प्रभसिमरन सिंग 1 रनवर आऊट झाला. त्यानंतर कॅप्टन श्रेयस 13 बॉलमध्ये 8 रन्स करुन माघारी परतला. जॅक एडवर्ड्सने श्रेयसला बोल्ड केलं. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 3 आऊट 17 अशी नाजूक स्थिती झाली.
श्रेयस अय्यर याने पहिल्या सामन्यात 110 धावांची खेळी केली होती. तसेच प्रभसिमरनने 56 धावांचं योगदान दिलं होतं. भारताने या जोरावर 413 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कांगारुंना 33.1 ओव्हरमध्ये 242 रन्सवर गुंडाळलं. भारताने यासह पहिला सामना 171 धावांनी जिंकला.