Shreyas Iyer चं पहिल्याच सामन्यात स्फोटक शतक, कांगारुंना ठोकत मालिकेत कडक सुरुवात
India A vs Australia A 1st unofficial ODI: टीम इंडियापासून दूर असलेल्या श्रेयस अय्यर याने ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या पहिल्या अनऑफिशियल वनडे मॅचमध्ये अप्रतिम सुरुवात केली आहे. श्रेयसने खणखणीत शतक ठोकलं आहे.

इंडिया ए टीमचा कर्णधार श्रेयस अय्यर याने ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या पहिल्या अनऑफीशियल वनडे मॅचमध्ये खणखणीत आणि वादळी शतक ठोकलं आहे. उभयसंघात एकूण 2 कसोटी सामने खेळवण्यात आले. त्यानंतर 30 सप्टेंबरला पहिला एकदिवसीय सामना नियोजित होता. मात्र पावसामुळे या सामन्यात टॉसही होऊ शकला नाही. परिणामी हा सामना बुधवारी 1 ऑक्टोबरला कानपूरमधील ग्रीन पार्क इथेच खेळवण्यात येत आहे. श्रेयसने या सामन्यातील पहिल्या डावात शतक ठोकलंय. श्रेयसने अवघ्या 75 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. श्रेयसने तिसऱ्या स्थानी येत हे शतक केलं.
श्रेयसने मैदानात उतरताच आक्रमक सुरुवात केली. श्रेयसने यासह आपला हेतू स्पष्ट केला. श्रेयसने या दरम्यान चौफेर फटकेबाजी केली. श्रेयसची 2025 या वर्षातील ही आयपीएलच्या 18 व्या हंगामानंतरची सर्वात मोठी खेळी ठरली. श्रेयस या सामन्यात टीम इंडियासाठी शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. श्रेयसआधी ओपनर प्रियांश आर्य याने शतक ठोकलं.
श्रेयसला शतकानंतर आणखी मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र श्रेयस शतकाच्या 8 चेंडूनंतर आऊट झाला. श्रेयसला शतकानंतर फक्त 10 धावाच जोडता आल्या. श्रेयसने 83 बॉलमध्ये 132.53 च्या स्ट्राईक रेटने 110 रन्स केल्या. श्रेयसने या खेळीत 4 षटकार आणि 12 चौकार लगावले.
प्रियांश आर्याचं खणखणीत शतक
त्याआधी ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या सलामी जोडीने टीम इंडियाला अप्रतिम सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी शतकी भागीदारी केली. सिंह आर्य जोडीने पहिल्या विकेटसाठी 20.3 ओव्हरमध्ये 135 धावा जोडल्या. भारताने प्रभसिमरन सिंह याच्या रुपात पहिली विकेट गमावली. प्रभसिमरनने 53 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 फोरसह 56 रन्स केल्या.
त्यानंतर प्रियांशने दुसर्या विकेटसाठी श्रेयस अय्यर याच्यासह 40 रन्स जोडल्या. प्रियांशने या दरम्यान शतक पूर्ण केलं. मात्र प्रियांश शतकांनतर 1 धावच जोडू शकला. प्रियांशने 84 चेंडूत 5 षटकार आणि 11 चौकार लगावले.
श्रेयस अय्यरचा रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेक
दरम्यान श्रेयस अय्यर याने काही महिन्यांसाठी रेड बॉल क्रिकेटमधून विश्रांची घेतली आहे. श्रेयसने बीसीसीआयला याबाबत मेलद्वारे माहिती दिली आहे. श्रेयसने रेड बॉल क्रिकेटच्या हिशोबाने माझी फिटनेस नसल्याचं बीसीसीआयला कळवलं आहे. त्यामुळे आता बीसीसीआय निवड समिती श्रेयसला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी 20i सामने खेळणार आहे.
