
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. भारताचा पहिला सामना युएईविरुद्ध 10 सप्टेंबरला होणार आहे. तर दुसरा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. मात्र यावेळी भारत पाकिस्तान सामन्याचं महत्त्व काही वेगळंच आहे. कारण पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही संघ मैदानात भिडणार आहेत. हा सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. यासाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. पाकिस्तानला मैदानात गाडण्यासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. पण या सामन्यापूर्वी दोन्ही मैदानात दिसले. आयसीसी अकादमी मैदानात सराव करताना दिसले. दोन्ही एकाच मैदानात होते. पण भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंचं तोंड देखील पाहिलं नाही. मैदानाच्या एका बाजूला भारतीय संघ सराव करत राहिला. तर दहशतवाद्यांना खतपाणी घालणारा पाकिस्तानी संघ दुसऱ्या बाजूला सराव करत होता. रिपोर्टनुसार, भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंच्या जवळ जाणं देखील पसंत केलं नाही.
रिपोर्टनुसार, आशिया कप स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंना भेटणं टाळलं. त्यामुळे हस्तांदोलन करण्याचा संबंधच आला नाही. पाकिस्तानी संघ जेव्हा दुबईच्या आयसीसी अकादमीत पोहोचला तेव्हा टीम इंडिया तिथे सराव करत होती. पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना सराव करताना पाहिलं. त्यानंतर त्यांच्या सरावाची आखणी करण्यास गुंतून गेली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 सप्टेंबरला दुबईत खेळला जाणार आहे.
आशिया कप स्पर्धा टी20 फॉर्मेटमध्ये होणार आहे. तसं पाहिलं या स्पर्धेत भारताचं पारडं जड दिसत आहे. या स्पर्धेतील टी20 फॉर्मेटमध्ये दोन्ही तीन वेळा आमनेसामने आले. यात भारताने दोन वेळा, तर पाकिस्तानने एक वेळा विजय मिळवला आहे. दरम्यान, पाकिस्तानी संघ ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीसाठी तयारी करत आहे. या मालिकेतील अंतिम सामना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात होत आहे. त्यामुळे कोण बाजी मारतो? याची उत्सुकता आहे. कारण या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानला 39 धावांनी पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला 18 धावांनी पराभूत केलं.