AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : भारतीय खेळाडूकडून टीम बदलण्याची घोषणा, आशिया कपआधी मोठा बॉम्ब

Hanuma Vihari Domestic Cricket : देशांतर्गत क्रिकेट हंगामाला 28 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेपासून या हंगामाची सुरुवात होणार आहे. त्याआधी क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.

Cricket : भारतीय खेळाडूकडून टीम बदलण्याची घोषणा, आशिया कपआधी मोठा बॉम्ब
Image Credit source: Stu Forster/Getty Images
| Updated on: Aug 25, 2025 | 11:46 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी सर्वच संघ सज्ज आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यानंतर आशिया कप स्पर्धेनिमित्ताने मैदानात उतरणार आहे. तर इतर संघ टी 20i मालिका खेळून या स्पर्धेत उतरणार आहेत. आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना हा 9 सप्टेंबरला होणार आहे. यूएईकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. या स्पर्धेसाठीची तयारी अखेरच्या टप्प्यात आहे. ही अशी लगबग सुरु असताना भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या एका खेळाडूने मोठी घोषणा केली आहे.

टीम इंडियाच्या खेळाडूने संघ बदलणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हा खेळाडू आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये नव्या टीमकडून खेळताना दिसू शकतो. या खेळाडूने आपल्या क्रिकेट असोसिएशनकडे दुसऱ्या संघासोबत खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागितलं आहे. नियमांनुसार, दुसर्‍या संघाकडून खेळण्यासाठी पहिल्या संघाकडून एनओसी घेणं बंधनकारक असतं. विशेष म्हणजे या खेळाडूने गेल्या वर्षीही टीम बदलण्याची घोषणा केली होती. मात्र 5 महिन्यांनी हा निर्णय बदलला होता. तो खेळाडू कोण आहे? हे जाणून घेऊयात.

हनुमा विहारी याची मोठी घोषणा

हनुमा विहारी देशांतर्गत क्रिकेटमध्ये नव्या संघाकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. हनुमा आंध्र क्रिकेट असोसिएशनसाठी खेळत होता. हनुमाने एसीएकडे एनओसीची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हनुमा आता त्रिपुराकडून खेळू शकतो. हनुमाला त्रिपुराच्या नेतृत्वाची जबाबदारीही मिळू शकते.

हनुमा विहारी याने काय म्हटलं?

“मी बदलाबाबत विचार करत आहे. त्रिपुराकडून मला खेळण्याबाबत विचारणा करण्यात आली”, असं हनुमाने क्रिकबझसोबत बोलताना म्हटलं. तसेच हुनमाने एनओसीसाठी अर्ज केला असल्याचंही सांगितलं.

हनुमा विहारी याची देशांतर्गत क्रिकेटमधील आकडेवारी

हनुमाला देशातंर्गत क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. हनुमाला 131 फर्स्ट क्लास आणि 97 लिस्ट ए सामने खेळण्याचा अनुभव आहे. हनुमाने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 24 शतकं आणि 51 अर्धशतकं केली आहेत. तसेच हनुमा आता फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 10 हजार धावांच्या उंबरठ्यावर आहे. हनुमाने आतापर्यंत 9 हजार 585 धावा केल्या आहेत.

हनुमा विहाराची कसोटी कारकीर्द

तसेच हनुमाने भारताचं 16 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. हनुमाने या 16 सामन्यांमध्ये 839 धावा करण्यासह 5 विकेट्सही घेतल्या आहेत.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.