AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप स्पर्धेपूर्वीच पाकिस्तानचा पराभव निश्चित! टीम इंडियाकडे विजयाची अशी रणनिती, जाणून घ्या

आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. पण या स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा सामना भारत पाकिस्तान यांच्यात होणार आहे. पण भारताकडे या स्पर्धेपूर्वीच पाकिस्तानला पराभूत करण्याची ब्लू प्रिंट असणार आहे. कसं काय ते जाणून घ्या.

आशिया कप स्पर्धेपूर्वीच पाकिस्तानचा पराभव निश्चित! टीम इंडियाकडे विजयाची अशी रणनिती, जाणून घ्या
आशिया कप स्पर्धेपूर्वीच पाकिस्तानचा पराभव निश्चित! टीम इंडियाकडे विजयाची अशी रणनिती, जाणून घ्याImage Credit source: PTI
| Updated on: Aug 28, 2025 | 8:02 PM
Share

आशिया कप स्पर्धेच्या जेतेपदासाठी आठ संघांनी कंबर कसली आहे. यात भारतीय संघ जेतेपदाचा प्रमुख दावेदार असून गतविजेता आहे. भारताच्या विजयाच्या वाटेत पाकिस्तान आणि श्रीलंकेचा अडसर ठरू शकतो. पण भारताला पाकिस्तानविरुद्ध रणनिती ठरवण्यासाठी आधीच ब्लू प्रिंट मिळणार आहे. 29 ऑगस्टपासून पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि युएई यांच्यात ट्राय सीरिज होणार आहे. पाकिस्तानने या ट्राय सीरिज आणि आशिया कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. दोन्ही संघात तेच खेळाडू आहेत. त्यामुळे आशिया कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी संघाचं अफगाणिस्तान आणि युएईविरुद्ध कशी कामगिरी राहील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण या संघाचं नेतृत्वा सलमान अली आगाकडे सोपवलं असून बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना डावललं आहे. असं असताना एका टीव्ही शोमध्ये शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाची पिसं काढली आहेत. दुसरीकडे, भारतीय संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद या खेळाडूंमध्ये आहे. त्यामुळे भारताची बाजू भक्कम आहे. पण सामन्याच्या दिवशी नाणं खणखणीत वाजणं आवश्यक आहे.

शोएब अख्तरने सांगितलं की, पाकिस्तान ट्राय सीरिजमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध जिंकणार नाही. ही मालिका संपेल तसं आशिया कपमधून बाहेर असलेल्या बाबर आझमला संघात घेतलं जाईल. दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ ट्राय सीरिजमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही तर भारतासाठी चांगली बातमी आहे. कारण या मालिकेतील पाकिस्तानच्या कामगिरीकडे भारतीय संघाचं बारीक लक्ष असेल. काय चुका होतात त्याचं योग्य निरीक्षण करून अमलबजावणी केली जाईल. त्यामुळे आशिया कप स्पर्धेपूर्वीच पाकिस्तान संघावर दडपण वाढलं आहे.

पाकिस्तानला आशिया कप स्पर्धेपूर्वी ही मालिका जिंकणं काहीही करून भाग आहे. कारण पाकिस्तान संघावर त्यांच्याच आजी माजी खेळाडूंनी अविश्वास दाखवला आहे. त्यामुळे पाकिस्तानने ही मालिका जिंकली नाही तर आशिया कप स्पर्धेपूर्वी संघात लगेच बदल केले जातील. आऊट ऑफ फॉर्म असलेल्या खेळाडूंना बाहेर केलं जाईल. दुसरीकडे, अफगाणिस्तान आणि युएई संघांना लिंबूटिंबू समजून चालणार नाही. मागच्या काही वर्षात या संघात कमालीची सुधारणा झाली आहे. अफगाणिस्तान या स्पर्धेत मोठा उलटफेर करू शकते.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!