Legends League: अरेरे, फायनलमध्ये पहिल्याच बॉलवर Sachin Tendulkar ची दांडी गुल, पहा VIDEO

Legends League: सचिन तेंडुलकरकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण नुवान कुलसेकराचा तो चेंडूचा भारी होता

Legends League: अरेरे, फायनलमध्ये पहिल्याच बॉलवर Sachin Tendulkar ची दांडी गुल, पहा VIDEO
Sachin-Tendulkar Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 1:35 PM

मुंबई: टीम इंडिया T20 वर्ल्ड कपच्या (T20 World cup) फायनलमध्ये पोहोचणार की, नाही ते ठाऊक नाही. पण निवृत्त झालेल्या क्रिकेटपटुंची इंडिया लिजेंडस (India Legends) टीम रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या फायनलमध्ये पोहोचली होती. या टीमने श्रीलंका लिजेंडसचा 33 धावांनी पराभव केला. सलग दुसऱ्यांदा सचिनच्या नेतृत्वाखाली इंडिया लिजेंडसने विजेतेपद मिळवलं. या मॅचमध्ये कॅप्टन सचिन तेंडुलकरकडून (Sachin Tendulkar) भरपूर अपेक्षा होत्या. पण त्याला खातही उघडता आलं नाही.

फायनल कुठे झाली?

छत्तीसगडच्या रायपूरमध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा फायनल सामना खेळला गेला. इंडिया लिजेंडसच नेतृत्व सचिन तेंडुलकर करत होता. सचिनच्या टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सचिन तेंडुलकरच्या बॅटमधून एक चांगली इनिंग पहायला मिळेल, अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा होती. पण असं झालं नाही.

सचिन गोल्डन डक

सचिन तेंडुलकर आणि नमन ओझाची जोडी फायनलमध्ये ओपनिंगला आली होती. श्रीलंकेने नुवान कुलसेकराला वेगवान गोलंदाजीची जबाबदारी दिली होती. ओव्हरमधील पहिल्या पाच चेंडूंचा सामना नमन ओझाने केला. सहाव्या चेंडूवर सचिन स्ट्राइकवर होता. इंडिया लिजेंडसच्या चाहत्यांना पुढच्या काही सेकंदात जोरदार झटका बसला.

कुलसेकराने गुड लेंथवर बॉल टाकला. सचिनने त्या बॉलवर स्ट्रेट ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू शेवटच्या क्षणी थोडासा आता आला. सचिनला चकवत चेंडूने थेट ऑफ स्टम्प उडवला.

रैनाही कमाल करु शकला नाही

सचिन बाद झाल्यानंतर मैदानात एकच सन्नाटा निर्माण झाला होता. निवृत्त होण्याआधी सुद्धा सचिन बाद व्हायचा तेव्हाही मैदानात अशीच चिडीचूप शांतता पसरायची. चाहते निराश झाले. त्यानंतर आणखी एक झटका बसला. सुरेश रैना काही खास करु शकला नाही. 2 चेंडूत 4 धावा करुन तो सुद्धा कुलसेकराच्या गोलंदाजीवर बाद झाला.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.