AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI 3rd ODI: ‘हे’ तीन खेळाडू बाहेर होऊ शकतात, जाणून घ्या तिसऱ्या वनडेसाठी कशी असेल Playing-11

भारताने पहिल्या दोन वनडे जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. टीम इंडियाकडे (IND vs WI) आता क्लीन स्वीपची संधी आहे. वनडे सीरीज मधला शेवटचा सामना उद्या बुधवारी होणार आहे.

IND vs WI 3rd ODI: 'हे' तीन खेळाडू बाहेर होऊ शकतात, जाणून घ्या तिसऱ्या वनडेसाठी कशी असेल Playing-11
| Updated on: Jul 26, 2022 | 2:30 PM
Share

मुंबई: भारताने पहिल्या दोन वनडे जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. टीम इंडियाकडे (IND vs WI) आता क्लीन स्वीपची संधी आहे. वनडे सीरीज मधला शेवटचा सामना उद्या बुधवारी होणार आहे. तिसऱ्या वनडे आधी राहुल द्रविड प्लेइंग 11 मध्ये बदल करतील का? हा प्रश्न आहे. पहिले दोन सामने बेंचवर बसलेल्या खेळाडूंना राहुल द्रविड (Rahul Dravid) संधी देतील का ? असा प्रश्न आहे. पहिल्या दोन वनडे सामन्यात इशान किशन, (Ishan Kishan) ऋतुराज गायकवाड आणि अर्शदीप सिंहला संधी मिळाली नव्हती. तिसऱ्या वनडेत या तीन खेळाडूंना संधी मिळू शकते. प्रश्न हा आहे की, त्यासाठी कुठल्या खेळाडूंना बाहेर बसवणार?.

यॉर्कर चेंडूंचा अचूकतेने वापर केला

अर्शदीप सिंहला मोहम्मद सिराजच्या जागी संधी मिळू शकते. सिराज पहिले दोन वनडे खेळला असून त्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. पहिल्या वनडेत तो सुद्धा भारताच्या विजयाचा हिरो होता. शेवटच्या षटकात त्याने हुशारीने गोलंदाजी केली होती. यॉर्कर चेंडूंचा अचूकतेने वापर केला होता. ऋतुराज गायकवाडला शुभमन गिलच्या जागी संधी मिळू शकते. इशान किशनला श्रेयस अय्यरच्या जागी संधी मिळू शकते. राहुल द्रविड हे तीन बदल करतात का ? ते सामन्याच्यादिवशीच कळेल. कारण शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर दोघेही चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. श्रेयसने पहिल्या दोन वनडे सामन्यात सलग दोन अर्धशतक झळकावली आहेत. शुभमनने पहिल्या वनडेत अर्धशतक झळकावलं. दुसऱ्या सामन्यात त्याने 43 धावा केल्या होत्या.

टीम इंडियाकडे मोठी संधी

भारताने वेस्ट इंडिजवर विजयी आघाडी घेतली असली, तरी तिसरा वनडे सामना भारतासाठी खास आहे. कारण भारताने आतापर्यंत वेस्ट इंडिजला त्याच्याच घरात क्लीन स्वीप केलेलं नाही. आता टीम इंडियाकडे मोठी संधी आहे.

तिसऱ्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग 11

इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन (कॅप्टन), दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, आवेश खान आणि शार्दुल ठाकूर,

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.