AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ 3rd T20 : भारतीय प्लेइंग 11 मध्ये उमरान, पृथ्वीला मिळू शकते संधी, असं बनू शकतं समीकरण

IND vs NZ 3rd T20 : आजचा सामना निर्णायक असेल. मॅच जिंकणारा संघ सीरीजही जिंकेल. नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने आपला शेवटचा T20 सामना मार्च 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला होता.

IND vs NZ 3rd T20 : भारतीय प्लेइंग 11 मध्ये उमरान, पृथ्वीला मिळू शकते संधी, असं बनू शकतं समीकरण
umran-MalikImage Credit source: PTI
| Updated on: Feb 01, 2023 | 3:06 PM
Share

India Predicted XI vs NZ 3rd T20I : तिसरा T20 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. सध्या सीरीजमध्ये दोन्ही टीम्स 1-1 अशा बरोबरीत आहेत. आजचा सामना निर्णायक असेल. मॅच जिंकणारा संघ सीरीजही जिंकेल. नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने आपला शेवटचा T20 सामना मार्च 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला होता. यात भारताने विजय मिळवला होता. भारताने त्या मॅचमध्ये 224 धावा केल्या होत्या. आज तिसऱ्या टी 20 सामन्यात अहमदाबादच्या पीचवर धावांचा पाऊस पडेल. दुसऱ्याबाजूला सगळ्यांची नजर भारताच्या प्लेइंग 11 वर असेल. पृथ्वी शॉ आणि उमरान मलिक यांना प्लेइंग 11 मध्ये संधी मिळते का ? त्याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुक्ता आहे.

शुभमन गिलच्या जागी पृथ्वी शॉ ला संधी

शुभमन गिल चालू टी 20 सीरीजमध्ये विशेष कमाल दाखवू शकलेला नाही. त्याच्याजागी पृथ्वी शॉ ला शेवटच्या टी 20 सामन्यात संधी मिळू शकते. इशान किशनचा परफॉर्मन्सही खास नाहीय. पण विकेटकीपर म्हणून त्याला संधी मिळू शकते. शुभमनच्या जागी पृथ्वी ला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते.

अर्शदीपच्या जागी उमरान ?

दुसऱ्या समीकरणानुसार, उमरान मलिकला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते. अर्शदीपला बाहेर बेंचवर बसाव लागेल. अर्शदीपने या सीरीजमध्ये खास परफॉर्मन्स केलेला नाही. टीम मॅनेजमेंट उमरानच्या स्पीडवर विश्वास ठेवू शकते. त्याला अखेरच्या टी 20 मध्ये संधी मिळू शकते. त्याशिवाय भारताच्या प्लेइंग 11 मध्ये फार बदल होण्याची शक्यता नाहीय.

अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन

इशान किशन, पृथ्वी शॉ/ शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), वाशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, उमरान मलिक, शिवम मावी

भारतीय टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), सूर्यकुमार यादव, इशान किशन, शुभमन गिल, पृथ्वी शॉ, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार न्यूजीलंड: मिचेल सँटनर (कॅप्टन), फिन एलेन, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, डेवोन कॉनवे, डेन क्लीवर, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, बेंजामिन लिस्टर, डेरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, माइकल रिपन, हेनरी शिपले, इश सोढ़ी आणि ब्लेयर टिकनर

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.