AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: विराटच्या अनुपस्थितीत ‘या’ खेळाडूला टीम इंडियाकडून दीर्घकाळ खेळण्याची मिळू शकते संधी

IND vs SL: अखेर त्याचे दिवस बदलणार, सातत्याने त्याच्यावर अन्याय होत असल्याची ओरड सुरु होती, कोण आहे तो?

IND vs SL: विराटच्या अनुपस्थितीत 'या' खेळाडूला टीम इंडियाकडून दीर्घकाळ खेळण्याची मिळू शकते संधी
Virat Kohli Image Credit source: Getty Images
| Updated on: Dec 27, 2022 | 6:38 PM
Share

मुंबई: क्रिकेटच्या तीन प्रकारात T20 फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा चेहरा-मोहरा बदललेला दिसू शकतो. T20 मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना यापुढे संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांच्याजागी काही युवा खेळाडूंना संधी मिळू शकते. टीम इंडियात सातत्याने आत-बाहेर करणाऱ्या संजू सॅमसनला दीर्घकाळ खेळण्याची संधी मिळू शकते. केरळच्या कॅप्टनला व्हाइट बॉल फॉर्मेटमध्ये दीर्घकाळ संधी मिळाली पाहिजे, असा बीसीसीआय आणि मावळत्या निवड समितीचा विचार आहे.

वनडे टीममध्ये संधी कमी

संजू सॅमसनला वनडे टीममध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. पण T20 मध्ये त्याचा प्रामुख्याने विचार होऊ शकतो. श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या सीरीजसाठी संजू सॅमसनची टीम इंडियात निवड होऊ शकते.

संजूला कशी संधी मिळेल?

संजू सॅमसनला मर्यादीत संधी मिळाल्या. त्यात त्याने चांगल्या धावा केल्या. पण तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. कसोटीमध्ये ऋषभ पंतला विकेटकीपर म्हणून पहिली पसंती आहे. वनडेमध्ये केएल राहुल विकेटकीपिंगची जबाबदारी संभाळतोय. त्यामुळे टी 20 मध्ये संजूला त्याचं स्थान भक्कम करण्याची संधी आहे.

आता ते सिलेक्टर्स ठरवतील

“संजू सॅमसन टॅलेंटेड क्रिकेटर आहे. बॅटिंग ऑर्डरमध्ये तो सहजतेने कुठेही फिट होऊ शकतो. त्याने त्याच्याबाजूने शक्य असेल, ते सर्व केलय. त्याला दीर्घकाळ संधी मिळाली पाहिजे. पण दोन अन्य क्रिकेटर्सही चांगली कामगिरी करतायत. कसोटीमध्ये ऋषभ पहिली पसंत आहे. पण योग्य खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे. यावर टीम मॅनेजमेंटला निर्णय घ्यायचा आहे. संजूला दीर्घकाळ कशी संधी मिळेल? ते सिलेक्टर्स ठरवतील” इनसाइड स्पोर्टने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलय. सिलेक्टर्सना संजूकडून एकच अपेक्षा

सिलेक्टर्सना संजूकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर वसिम जाफरने सुद्धा संजू सॅमसनला दीर्घकाळ संधी देण्याची मागणी केलीय. आतापर्यंत अनेकदा संजूवर अन्याय झाल्याचा मुद्दा उपस्थित झालाय. चाहत्यांनी आक्रमकपणे संजूची बाजू मांडलीय.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच