AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India T20 WC squad: टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची आज निवड?कुठल्या 15 खेळाडूंना मिळणार संधी?

India T20 WC squad: बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीची आज म्हणजे सोमवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे.

India T20 WC squad: टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची आज निवड?कुठल्या 15 खेळाडूंना मिळणार संधी?
team india Image Credit source: AFP
| Updated on: Sep 12, 2022 | 3:05 PM
Share

मुंबई: बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीची आज म्हणजे सोमवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्या संदर्भात ही बैठक होणार आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी सोमवारी दुपारी सिलेक्टर्सची बैठक होत असल्याची माहिती दिली. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आज संघ निवड होणार का? त्याबद्दल त्यांनी खुलासा केलेला नाही.

टी 20 वर्ल्ड कपसाठी आजच संघ जाहीर होणार का?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप खेळणार आहे. “टी 20 वर्ल्ड कपसाठी आजच संघ जाहीर होणार का? याबद्दल आता मी सांगू शकत नाही. पण सिलेक्टर्स आज दुपारी भेटणार आहेत” असं धुमल इनसाइडस्पोर्टला म्हणाले. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका सीरीजसाठी सुद्धा टीम आज निवडली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

टीम निवडताना फार विचार मंथन कराव लागणार नाही

बीसीसीआय पदाधिकाऱ्याच हे वक्तव्य अजिबात आश्चर्यकारक नाहीय. याआधी सुद्धा सिलेक्टर्सची आधी बैठक झालीय. पण टीमची घोषणा दुसऱ्यादिवशी झाली आहे. यावेळी सुद्धा असच होऊ शकतं. सिलेक्टर्सनी वर्ल्ड कपसाठी टीम निवडताना फार विचार मंथन कराव लागणार नाहीय. कारण 90 टक्के टीम जवळपास निश्चित आहे. फक्त तीन ते चार खेळाडूंच्या नावावर विचार होऊ शकतो.

त्याचं खापर निवड समितीवरही फोडण्यात आलं

आशिया कपमध्ये टीम इंडिया अपयशी ठरली. त्याच खापर निवड समितीवरही फोडण्यात आलं. वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवूनच मागच्या काही महिन्यांपासून टीम इंडिया सातत्याने टी 20 मालिका खेळत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियाने दमदार प्रदर्शन केलं आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन