
नागपूर : आज नागपुरात ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Ind Vs Aus) दुसरा टी-20 (t20) सामना होतोय. पण, या सामन्यावर आता पावसाचं सावट आलंय. पहिल्या सामन्यात मोठं लक्ष्य ठेवल्यानंतरही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागलाय. 208 धावा करूनही टीम इंडियाच्या हाती मागच्या सामन्यात पराभव आला. तीन सामन्यांची मालिका जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघ आज दुसऱ्या T20 सामन्यात दमदार कामगिरी करेल. पण, जसप्रीत बुमराहबाबत (Jasprit Bumrah) अजूनही संभ्रम कायम आहे.
Touchdown Nagpur ??#TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/Odt7nFjlTe
— BCCI (@BCCI) September 21, 2022
इंग्लंड दौऱ्यानंतर बुमराहनं एकही सामना खेळलेला नाही. पाठदुखीनं तो आशिया कपमध्ये खेळू शकलेला नाही. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली होती. पण, मोहालीतील पहिल्या सामन्यात संघ व्यवस्थापनानं त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलेलं नाही. त्यामुळे तो आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, जसप्रीत बुमराह दुसऱ्या सामन्यात खेळताना दिसू शकतो, असंही बोललं जातंय.
दोन्ही संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन आम्ही तुम्हाला सांगत आहोत. पण, सामन्यापूर्वी म्हणजे ऐनवेळी यात बदलही होऊ शकतो.
टीम इंडिया, संभाव्य प्लेइंग इलेव्हन
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल/दीपक चहर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलिया, संभाव्य प्लेइंग इलेव्हन
अॅरॉन फिंच, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.