
मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील भारत आणि बांगलादेशमध्ये17वा सामना सुरू आहे. (IND vs BAN) बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांन बांगलादेशच्या फलंदाजांवर अंकुश ठेवलं आहे. (Ravindra Jadeja Best Catch against Bangladesh) फक्त गोलंदाजीच नाहीतर फिल्डिंगमध्येही भारतीय खेळाडूंनी कसर सोडली नाही. भारताचा स्टार फिल्डर रविंदज्र जडेजाचं नावचं बस आहे. आज परत एकदा जड्डूने चमत्कार करून दाखवला. रविंद्र जडेजा याने पाईंटला फिल्डिंग करत असताना डाय मारत कडक कॅच घेतला.
बांगलादेश संघाच्या विकेट गेल्या असाताना मुशफिकुर रहिम हा मैदानावर एक बाजू लढवत होता. 43 व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहकडे रोहित शर्मा याने चेंडू दिला होता. जसप्रीतच्या तिसऱ्या चेंडूवर मुशफिकुरने कट शॉट खेळला, वाऱ्याच्या वेगाने जात असलेल्या चेंडूवर जडेजाने हवेत झेप घेत झडप घातली. रविंद्र जेडजाने उजव्या बाजूली डाय मारत एक कमाल कॅच पकडला.
बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना 256-8 धावा केल्या यामध्ये सलामीवील लिटन दास याने सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यासोबतच शेवटला महमुदुल्ला याने 46 धावा करत संघाची धावसंख्या 250 पार पोहोचवली होती.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद, नजमुल हुसेन शांतो (C), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (Wk), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम