India vs England 3rd ODI : आज भारत-इंग्लंड फायनल, ब्रिटिशांच्या जमिनीवर जिंकण्याचं आव्हान, वनडेच्या रंजक आकड्यांविषयी जाणून घ्या…

| Updated on: Jul 17, 2022 | 6:49 AM

India vs England 3rd ODI : लॉर्ड्सवरील शेवटच्या सामन्यात 100 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघ मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील निर्णायक सामन्यात त्यांच्या रणनीतीत थोडा बदल करण्याची शक्यताय. आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी विशेष आहे.

India vs England 3rd ODI : आज भारत-इंग्लंड फायनल, ब्रिटिशांच्या जमिनीवर जिंकण्याचं आव्हान, वनडेच्या रंजक आकड्यांविषयी जाणून घ्या...
आज भारत-इंग्लंड फायनल सामना
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली :  भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या (3rd ODI) मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत असून मँचेस्टरमधील तिसरा सामना जिंकणारा संघ मालिकेवर कब्जा करेल. तिसरा एकदिवसीय सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. या सामन्यासाठी इंडियन प्लेइंग-11 (Playing 11) मध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही. लॉर्ड्सवरील शेवटच्या सामन्यात 100 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर, भारताला मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील निर्णायक सामन्यात त्यांच्या फलंदाजीच्या रणनीतीमध्ये बदल करायचे आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघानं नुकत्याच संपलेल्या T20I मालिकेदरम्यान अतिशय आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केलं. मात्र, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ज्या पद्धतीनं संघाने 247 धावांच्या कमी धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग केला. त्यावरून भारताला बचावाऐवजी आक्रमक होण्याची गरज असल्याचं दिसतंय.

इंग्लंडमध्ये भारताचा रेकॉर्ड

  1. 1. वनडे सामने – 44
  2. भारताचा विजय – 17
  3. इंग्लंडचा विजय – 23

रोहित कबूल करणार की तो आणि शिखर धवन इंग्लंडच्या रीस टोपली आणि डेव्हिड विली यांच्या शानदार स्विंग्ससमोर थोडेसे बचावात्मक झाले होते. त्यानंतर विराट कोहलीच्या सततच्या अपयशानं अडचणीत भर पडली. रोहित आणि धवनसारख्या अनुभवी सलामीवीरांसमोर पहिली दोन षटके मेडन गेली. त्यातून सकारात्मक मानसिकता दिसून येत नाही. त्यामुळे आपल्या फलंदाजीच्या पद्धतीत नक्कीच बदल करावा लागणार. ओव्हलवरील पहिल्या वनडेमध्ये जसप्रीत बुमराहनं एकहाती सहा विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला. अशा स्थितीत तिसऱ्या वनडेतही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.

रोहित काय म्हणाला?

कर्णधार रोहितनंही संघाला खास आवाहन केलंय की, संघाची भूमिका पाहण्यापेक्षा खेळाडूंनी त्यांच्या खेळात वेगळे काय करता येईल हे पाहिलं पाहिजं. त्यांनी त्या परिस्थितीतून संघालाबाहेर काढले तर त्यांचा आत्मविश्वास किती वाढेल याचा विचार करा.

स्टोक्स, लिव्हिंगस्टोन फॉर्मात नाही

इंग्लंडची स्टार बॅटिंग लाइनअपही पहिल्या दोन सामन्यांमध्ये फारशा फॉर्ममध्ये नाही. यजमानांमध्ये जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, बेन स्टोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोनसारखे फलंदाज बचावात्मक फलंदाजी करत आहेत. नेदरलँड्सविरुद्ध 400 हून अधिक धावा करणारा तोच खेळाडू आहे, असं वाटत नाही.

धवन-कोहलीच्या भूमिकेबद्दल विचार

पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी 37 वर्षीय शिखर धवनला ते पहिली पसंती मानतात का हा भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघ व्यवस्थापनासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. धवन केवळ एकाच फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे त्याच्या लयीवर नक्कीच परिणाम होत आहे. कारण, त्याला जबरदस्तीने ब्रेक घ्यावा लागत आहे. एकदिवसीय विश्वचषकासाठी 15 महिने शिल्लक असताना धवनचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. टीम मॅनेजमेंटला विचार करावा लागेल की रोहित, धवन आणि कोहली हे भारताचे पहिले, दुसरे आणि तिसरे नंबरचे खेळाडू पुढे जातील का?

हे सुद्धा वाचा