AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: Virat Kohli पत्नी अनुष्कासोबत देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन, कीर्तनाचा Video Viral

IND vs ENG: विराट कोहलीची (Virat kohli) खराब फॉर्मशी झुंज सुरु आहे. इंग्लंड दौऱ्यात तो विशेष कमाल दाखवू शकलेला नाही. त्याची बॅट शांतच आहे.

IND vs ENG: Virat Kohli पत्नी अनुष्कासोबत देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन, कीर्तनाचा Video Viral
virat-anushka Image Credit source: hanuman dass instagram
| Updated on: Jul 16, 2022 | 11:58 AM
Share

मुंबई: विराट कोहलीची (Virat kohli) खराब फॉर्मशी झुंज सुरु आहे. इंग्लंड दौऱ्यात तो विशेष कमाल दाखवू शकलेला नाही. त्याची बॅट शांतच आहे. विराट कोहलीवरुन माजी क्रिकेटपटूंमध्ये (Former Cricketers) दोन गट पडले आहेत. एक गट विराटचं समर्थन करतोय, दुसऱ्या गटाने त्याला संघाबाहेर करण्याची मागणी केली आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) भजन कीर्तनात दंग आहे. माजी कर्णधार विराट कोहलीचे पत्नी अनुष्का शर्मा सोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लंडनमध्ये विराट आणि अनुष्का कृष्णदास कीर्तनात दंग झाले होते.

कुठे केलं होतं कीर्तनाचं आयोजन?

भारत आणि इंग्लंड मध्ये सध्या वनडे सीरीज सुरु आहे. दोन्ही संघ मालिकेत 1-1 असे बरोबरीत आहे. भारताने पहिली वनडे 10 विकेटने जिंकली. दुसऱ्यासामन्यात भारतचा 100 धावांनी पराभव झाला. आता तिसरा निर्णायक सामना 17 जुलैला मॅन्चेस्टर मध्ये खेळला जाणार आहे. या आधी कोहली कीर्तनामध्ये दिसला. हा व्हिडिओ व्हायरल होतोय. अमेरिकी गायक कृष्णा दासने लंडनमध्ये या कीर्तनाचं आयोजन केलं होतं. कृष्णा दास यांच्या शिष्यांपैकी एक असलेल्या हनुमान दास यांनी इन्स्टाग्रामवर कोहली आणि अनुष्का सोबतचे फोटो शेयर केले आहेत.

कधी होतं कीर्तन?

लंडनच्या युनियन चापेल मध्ये हा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. 14 आणि 15 जुलैला आयोजन करण्यात आलं होतं. भारत आणि इंग्लंड यांच्यात सीरीज मधला दुसरा वनडे सामनाही लंडन मध्ये झाला. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर झालेल्या सामन्यात भारताला 100 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात कोहली 25 चेंडूत 16 धावा करुन आऊट झाला.

ते फक्त तेंडुलकरला समजू शकतं

“आपण या विषयावर बोलत असताना, मी 8 महिन्यापूर्वीच ही गोष्ट सांगितली होती. विराट सध्या ज्या स्थितीमधून चाललाय, ते फक्त सचिन तेंडुलकरला समजू शकतं. विराटने सचिनला फोन करावा. लंचसाठी म्हणून दोघांनी एकत्र भेटलं पाहिजे” असं अजय जाडेजा सोनी सिक्सवर सामन्यानंतरच्या कार्यक्रमात म्हणाला होता.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.