AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Hong Kong T20 Live Streaming: उद्या हाँगकाँग विरुद्ध सामना, जाणून घ्या कधी, कुठे पाहू शकता मॅच

India vs Hong Kong T20 Live Streaming: टीम इंडियाचा (Team India) बुधवारी हाँगकाँग विरुद्ध (India vs Hong Kong) सामना होणार आहे. भारताने विजयाने आशिया कप (Asia cup) स्पर्धेतील अभियान सुरु केलं आहे.

India vs Hong Kong T20 Live Streaming: उद्या हाँगकाँग विरुद्ध सामना, जाणून घ्या कधी, कुठे पाहू शकता मॅच
Team india Image Credit source: BCCI
| Updated on: Aug 30, 2022 | 2:16 PM
Share

मुंबई: टीम इंडियाचा (Team India) बुधवारी हाँगकाँग विरुद्ध (India vs Hong Kong) सामना होणार आहे. भारताने विजयाने आशिया कप (Asia cup) स्पर्धेतील अभियान सुरु केलं आहे. भारताने पहिल्या सामन्यात परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर विजय मिळवला. भारताचा पुढचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. क्वालिफायर्स गटातून हाँगकाँगचा संघ मुख्य फेरीत पोहोचला आहे. हा सामना जिंकून सुपर 4 मध्ये जागा पक्का करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. हाँगकाँगचा संघ सलग दुसऱ्यांदा आशिया कप मध्ये खेळतोय. बलाढ्य भारताविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा हाँगकाँगचा प्रयत्न असेल.

क्वालिफायर खेळून आशिया कप मध्ये पोहोचला हाँगकाँगचा संघ

हाँगकाँगच्या टीमने आशिया कप क्वालिफायर्स मध्ये कुवेत, सिंगापूर आणि यूएई या टीम्सने हरवलं. पहिल्या सामन्यात सिंगापूरला 8 धावांनी हरवून त्यांनी चांगली सुरुवात केली. त्यानंतर हाँगकाँगच्या टीमने कुवेतवर एकतर्फी विजय मिळवला. यूएई विरुद्धचा सामना खूप महत्त्वाचा होता. एकप्रकारे ही व्हर्च्युअल फायनल होती. विजयी संघ आशिया कपसाठी पात्र ठरणार होता. हाँगकाँगच्या टीमने इथे बाजी मारली. हाँगकाँगच्या टीमने क्वालिफायर गटातील तिन्ही सामने जिंकले. ग्रुप मध्ये टॉपवर रहात त्यांनी आशिया कप मध्ये प्रवेश केला.

भारत आणि हाँगकाँग मध्ये आशिया कप 2022 चा सामना कधी खेळला जाणार?

भारत आणि हाँगकाँग मध्ये आशिया कप 2022 चा सामना बुधवारी 31 ऑगस्टला खेळला जाईल.

भारत-हाँगकाँग मध्ये आशिया कप 2022 चा सामना कुठे होणार?

भारत आणि हाँगकाँग मध्ये आशिया कप 2022 चा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये खेळला जाईल.

भारत आणि हाँगकाँग मध्ये आशिया कप 2022 चा सामना कधी सुरु होणार?

भारत आणि हाँगकाँग मध्ये आशिया कप 2022 चा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. संध्याकाळी 7 वाजता टॉस उडवला जाईल.

भारत-हाँगकाँग आशिया कप 2022 सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट कुठे होणार?

भारत आणि हाँगकाँग मधील आशिया कप 2022 सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या चॅनलवर होईल.

भारत आणि हाँगकाँग मधील आशिया कप 2022 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे होईल? भारत आणि हाँगकाँग मधील आशिया कप 2022 सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग डिजनी हॉटस्टार वर होईल. या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स तुम्ही TV9marathi.com वाचू शकता.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.