IND vs LEI: फर्स्ट क्लास क्रिकेटही न खेळलेल्या गोलंदाजासमोर टीम इंडियाचं ‘सरेंडर’, अँडरसन-ब्रॉडचा सामना कसा करणार?

IND vs LEI: प्रत्यक्ष कसोटीआधी टीम इंडिया सराव सामना खेळतेय. काल या सराव सामन्याचा पहिला दिवस होता. टीम इंडियाच्या फलंदाजांनी लीसेस्टरशायर विरुद्धच्या सामन्यात जी कामगिरी केलीय, ती निश्चित टेन्शन वाढवणारी आहे.

IND vs LEI: फर्स्ट क्लास क्रिकेटही न खेळलेल्या गोलंदाजासमोर टीम इंडियाचं 'सरेंडर',  अँडरसन-ब्रॉडचा सामना कसा करणार?
Indian palyer Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 11:09 AM

मुंबई: इंग्लंडमधील टेस्ट सीरीज (IND vs ENG) भारतीय संघाने जिंकावी, अशीच टीम इंडियाच्या प्रत्येक चाहत्यांची इच्छा आहे. मालिकेत भारतीय संघ 2-1 ने पुढे आहे. एजबॅस्टनमध्ये 1 जुलैपासून एकमेव कसोटी सामना खेळला जाणार आहे. मागच्यावर्षी बाकी राहिलेल्या मालिकेतील हा कसोटी सामना आहे. प्रत्यक्ष कसोटीआधी टीम इंडिया सराव सामना खेळतेय. काल या सराव सामन्याचा पहिला दिवस होता. टीम इंडियाच्या फलंदाजांनी लीसेस्टरशायर विरुद्धच्या सामन्यात जी कामगिरी केलीय, ती निश्चित टेन्शन वाढवणारी आहे. रोहित शर्मा, (Rohit Sharma) शुभमन गिल, (Shubhaman Gill) श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी फ्लॉप ठरले. महत्त्वाचं म्हणजे भारताच्या दिग्गज फलंदाजांनी अजूनपर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये न खेळलेल्या गोलंदाजासमोर शरणागती पत्करली. ही निश्चित चिंता वाढवणारी बाब आहे.

फक्त लिस्ट ए चे दोन सामने खेळलेत

रोमन वॉल्करने फर्स्ट क्लास मध्ये डेब्यु केलेला नाही. फक्त लिस्ट ए चे दोन सामने खेळलेत. पण या गोलंदाजाने रोहित, हनुमा विहारी आणि रवींद्र जाडेजा सारख्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

रोहितसाठी शॉर्ट चेंडूंचा वापर

रोमन वॉल्करने भारतीय फलंदाजांच्या त्रुटीवर वार केला. अलीकडे रोहित शर्मा शॉर्ट चेंडू खेळताना अडचणीत आलेला दिसलाय. वॉल्करने याच चेंडूचा वापर करुन त्याला आणखी त्रस्त करुन सोडलं. वॉल्करच्या शॉर्ट चेंडूवर पुलचा फटका खेळताना रोहित आऊट झाला. हनुमान विहारीने वॉल्करच्या चेंडूवर ऑन ड्राइव मारण्याचा प्रयत्न केला. पण याच बॉलवर त्याने स्लिप मध्ये झेल दिला. रवींद्र जाडेजाला वॉल्करने LBW आऊट केलं. वॉल्करने आपल्या स्विंग चेंडूंनी फलंदाजांना हैराण केलं.

कोण आहे रोमन वॉल्कर

रोमन वॉल्कर वेल्स क्रिकेटर आहे. 2019 मध्ये त्याने ग्लेमर्गनसाठी लिस्ट ए मध्ये डेब्यु केला होता. याआधी वॉल्करने 2018 साली अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये इंग्लंडसाठी सामना खेळला होता. या मॅचमध्ये त्याने दोन विकेट काढल्या होत्या. 2018 साली शुभमन गिलही अंडर 19 वर्ल्ड कप संघाचा भाग होता. त्याने शानदार प्रदर्शन करुन टीमला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. रोमन वॉल्करला जास्त क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही. भारताविरुद्ध वॉर्मअप मॅचमध्ये संधी मिळाल्यानंतर या खेळाडूने आपली प्रतिभा दाखवून दिली. भारताचे अव्वल फलंदाज इतका कमी अनुभव असलेल्या गोलंदाजासमोर सरेंडर करत असतील, तर जेम्स अँडसरन आणि स्टुअर्ट ब्रॉडचा सामना ते कसा करतील? हा प्रश्न उपस्थित होतोय.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.