India vs Namibia Toss result: अखेरच्या सामन्यात विराटने जिंकला टॉस, एका बदलासह भारतीय संघ मैदानात

| Updated on: Nov 08, 2021 | 7:16 PM

भारतीय क्रिकेट संघाचा यंदाच्या विश्वचषकातील प्रवास संपला आहे. न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचल्याने भारताच्या पुढील फेरीच्या आशा संपल्या आहेत. तरी देखील स्पर्धेतील शेवटचा सामना भारत आज नामिबीयाविरुद्ध खेळणार आहे.

India vs Namibia Toss result: अखेरच्या सामन्यात विराटने जिंकला टॉस, एका बदलासह भारतीय संघ मैदानात
भारत विरुद्ध नामिबीया
Follow us on

T20 World Cup 2021 : टी20 विश्वचषकातील भारताचा अखेरचा सामना काही मिनिटांत सुरु होत आहे. भारत आणि नामिबीया या सामन्याला दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरुवात होत आहे. भारताचा स्पर्धेतील प्रवास याआधीच संपला आहे. भारताच्या गटातून न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे संघ सेमीफायनलमध्ये गेल्याने भारत स्पर्धेबाहेर झाला आहे. तरी देखील आज शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करण्यासाठी भारत सज्ज झालेला आहे. मागील सामन्याप्रमाणे विराटला नशिबाने साथ दिल्यामुळे नाणेफेक भारताने जिंकली आहे. इतर संघाप्रमाणे धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताने प्रथम गोलंदाजी निवडली आहे.

भारताने आजच्या सामन्यासाठी केवळ एक बदल केला आहे. मागील सामन्यात संधी देण्यात आलेल्या वरुण चक्रवर्तीला विश्रांती देत आज राहुल चाहरला संधी दिली आहे. आतापर्यंत अधिक संधी न मिळाल्याने चाहरला आज संधी देण्यात आली असून आज तो काय कमाल करतो? त्यावर भविष्यातील त्याचं स्थान ठरु शकतं.

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, मोहम्मद शमी.

नामिबीया संघ: स्टीफन बार्ड, क्रेग विल्यम्स, जेगहार्ड एरासमस, डेविड विसे, जेजे स्मीत, जेन ग्रीन, मायकल लिनगेन, कार्ल बर्कनस्कॉक, जेन निकोल, रुबेन ट्रम्पलमन, बरनार्ड स्कॉझ

इतर बातम्या

मोठ्या वादात अडकला शोएब अख्तर, अचानक टीव्ही शो सोडणं पडलं महागात, चॅनेलने ठोकला 100 मिलीयनचा दावा

पाकिस्तानच्या खेळाडूचा धमाका, विश्वचषकातील खेळीने तोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, कोहलीसह बाबरलाही टाकलं मागे

(India vs Namibia Toss result: In india vs Namibia match India won the toss and elected to field first)