AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात या खेळाडूंकडे सामना फिरवण्याची क्षमता, जाणून घ्या प्लेइंग 11 आणि पिच रिपोर्ट

World Cup 2023, IND vs NZ : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील खऱ्या अर्थाने भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अतितटीचा सामना पाहायला मिळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांचं स्पर्धेत एक गणित आहे. चला जाणून घेऊयात सर्वकाही...

IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात या खेळाडूंकडे सामना फिरवण्याची क्षमता, जाणून घ्या प्लेइंग 11 आणि पिच रिपोर्ट
IND vs NZ : भारत न्यूझीलंड सामन्यात हे 11 खेळाडू ठरतील लकी, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन आणि इतर बाबी
| Updated on: Oct 21, 2023 | 5:25 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 21वा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. दोन्ही संघांची या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी राहिली आहे. त्यामुळे भारतासमोर न्यूझीलंडचं मोठं आव्हान असणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांनी स्पर्धेत सलग चार पैकी चार सामने जिंकले आहे. त्यामुळे गुणतालिकेत नंबर 1 साठी दोन्ही संघांची लढत होणार आहे. सध्या गुणतालिकेत न्यूझीलंड पहिल्या, तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यातील विजयी संघाला पहिलं स्थान मिळणार आहे. दुसरीकडे, वनडे वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ कायम भारताला डोकेदुखी ठरला आहे. मागच्या 20 वर्षात न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळालेला नाही. भारताने न्यूझीलंड विरुद्ध शेवटचा 2003 मध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे न्यूझीलंडला पराभूत करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. इतकंच काय तर 2019 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडमुळेच गाशा गुंडाळावा लागला होता.

भारत विरूद्ध न्यूझीलंड सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं वेगळ्या कारणासाठीही लक्ष लागून आहे. कोणते खेळाडू नशिबाचं दार उघडतील यासाठी आकडेमोड करत आहेत. मागच्या चार सामन्यांचा अंदाज बांधून खेळाडूंची निवड करणं सोपं होऊ शकतं. पण ऐनवेळी ते खेळाडू कामगिरी करतील की याबाबतही शंका आहे.

पिच रिपोर्ट

धर्मशाळेतील मैदान फलंदाजीसाठी चांगलं आहे. नव्या चेंडूसह गोलंदाजांना काही अंशी चांगला सीम मिळू शकतो. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर टीम पहिल्यांदा गोलंदाजी करणं पसंत करेल. कारण दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करणं सोपं होईल.

ड्रीम इलेव्हन 1

  • कर्णधार- रोहित शर्मा, उपकर्णधार- विराट कोहली
  • विकेटकीपर- डेवॉन कॉनवे, केएल राहुल
  • फलंदाज- शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, विल यंग
  • अष्टपैलू- रविंद्र जडेजा
  • गोलंदाज- जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, कुलदीप यादव.

ड्रीम इलेव्हन 1

  • कर्णधार- शुबमन गिल, उपकर्णधार- डेवोन कॉनवे
  • विकेटकीपर- केएल राहुल, डेवोन कॉनवे
  • फलंदाज- विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स
  • अष्टपैलू- रविंद्र जडेजा, रचिन रवींद्र
  • गोलंदाज- मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, आर अश्विन.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार),शुबमन गिल,विराट कोहली,श्रेयस अय्यर,केएल राहुल (विकेटकीपर),रविंद्र जडेजा,कुलदीप यादव,मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

न्यूजीलँड : डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रविंद्र, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, मिशेल सेंटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन,ट्रेंट बोल्ट.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत