India vs New Zealand T20I LIVE Score: झाकरी फाउल्क्स आऊट, न्यूझीलंडला सातवा झटका

India vs New Zealand T20I LIVE Cricket Score and Updates in Marathi: टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत 3-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे.

India vs New Zealand T20I LIVE Score: झाकरी फाउल्क्स आऊट, न्यूझीलंडला सातवा झटका
India vs New Zealand 4th T20i Live Score
Image Credit source: Tv9
| Updated on: Jan 28, 2026 | 8:36 PM

LIVE Cricket Score & Updates

  • 28 Jan 2026 08:36 PM (IST)

    IND vs NZ 4th T20i Live Score Updates : झाकरी फाउल्क्स आऊट, न्यूझीलंडला सातवा झटका

    अर्शदीप सिंह याने झाकरी फाउल्क्स याला आऊट करत न्यूझीलंडला एकूण सातवा झटका दिला आहे. झाकरीने 1 सिक्स आणि 1 फोरसह 6 बॉलमध्ये 13 रन्स केल्या.

  • 28 Jan 2026 08:23 PM (IST)

    IND vs NZ 4th T20i Live Score Updates : हार्दिक पंड्याचा रॉकेट थ्रो, मिचेल सँटनर रन आऊट, न्यूझीलंडला सहावा झटका

    टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने न्यूझीलंडच्या डावातील 17 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर चोरटी धाव घेणाऱ्या कर्णधार मिचेल सँटर याला नॉन स्ट्राईक एंडवर रन आऊट केलं आहे.  सँटनर याने 6 चेंडूत 11 धावा केल्या.

  • 28 Jan 2026 08:16 PM (IST)

    IND vs NZ 4th T20i Live Score Updates : मार्क चॅपमन आऊट, न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत

    रवी बिश्नोई याने चॅपमन याला हर्षित राणा याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. भारताने यासह न्यूझीलंडला पाचवा झटका दिला आहे. चॅपमन याने 8 बॉलमध्ये 9 धावा केल्या. तर रवीने चॅपमनला आऊट करत या सामन्यातील आपली पहिली विकेट मिळवली.

  • 28 Jan 2026 08:00 PM (IST)

    IND vs NZ 4th T20i Live Score Updates : न्यूझीलंडला मोठा झटका, सेट टीम सायफर्ट आऊट, टीम इंडियाचं कमबॅक

    अर्शदीप सिंह याने भारताला मोठी विकेट मिळवून दिली आहे. अर्शदीपने सेट ओपनर बॅट्समन टीम सायफर्ट याला रिंकू सिंह याच्या हाती कॅच आऊट करुन न्यूझीलंडला मोठा झटका दिला आहे. भारताने  यासह तिसरी तर अर्शदीपने पहिली विकेट मिळवली. सायफर्टने 36 चेंडूत 62 धावा केल्या.

  • 28 Jan 2026 07:44 PM (IST)

    IND vs NZ 4th T20i Live Score Updates : न्यूझीलंडला दुसरा झटका, रचीन रवींद्र आऊट, बुमराहला पहिलं यश

    जसप्रीत बुमराह याने न्यूझीलंडला 10 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर दुसरा झटका दिला आहे. बुमराहने आपल्याच बॉलिंगवर रचीन रवींद्र याला कॅच आऊट केलं आहे. रचीनने 4 बॉलमध्ये 2 रन्स केल्या. बुमराहने यासह या सामन्यातील आपली पहिली विकेट मिळवली.

  • 28 Jan 2026 07:42 PM (IST)

    IND vs NZ 4th T20i Live Score Updates : न्यूझीलंडला पहिला झटका, डेव्हॉन कॉनव्हे आऊट

    फिरकीपटू कुलदीप यादव याने टीम इंडियसााठी डोकेदुखी ठरलेली न्यूझीलंडची सलामी जोडी फोडली आहे. कॉनव्हेने नवव्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर सिक्स लगावला. यासह टीम सायफर्ट आणि डेव्हॉन कॉनव्हे या जोडीने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.  मात्र कुलदीपने कॉनव्हेला दुसऱ्याच बॉलवर रिंकू सिंह याच्या हाती कॅच आऊट केलं. कॉनव्हेने 23 बॉलमध्ये 44 रन्स केल्या.

  • 28 Jan 2026 07:39 PM (IST)

    IND vs NZ 4th T20i Live Score Updates : टीम सायफर्टचा अर्धशतकी धमाका, न्यूझीलंडच्या 100 धावा पूर्ण

    न्यूझीलंडचा ओपनर टीम सायफर्ट याने अवघ्या 25 चेंडूत विस्फोटक अर्धशतक पूर्ण केलंय. तसेच न्यूझीलंडने नवव्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर डेव्हॉन कॉनव्हे याने षटकार लगावला. यासह न्यूझीलंडच्या 100 धावा पूर्ण झाल्या.

  • 28 Jan 2026 07:29 PM (IST)

    IND vs NZ 4th T20i Live Score Updates : न्यूझीलंडच्या सलामी जोडीचा पावरमध्ये धमाका, 6 ओव्हरमध्ये 71 धावा

    न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनव्हे आणि टीम सायफर्ट या सलामी जोडीने स्फोटक सुरुवात केली आहे. या सलामी जोडीने पावरप्लेचा पूर्ण फायदा घेत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली आहे. या जोडीने 6 ओव्हरमध्ये बिनबाद 71 धावा केल्या आहेत. सायफर्ट 21 चेंडूत 46 धावांवर नाबद खेळत आहेत. तर कॉनव्हे याने 15 बॉलमध्ये 24 रन्स जोडल्या आहेत.

  • 28 Jan 2026 07:16 PM (IST)

    IND vs NZ 4th T20i Live Updates : न्यूझीलंडच्या सलामी जोडीची आक्रमक सुरुवात, टीम इंडिया विकेटच्या शोधात

    डेव्हॉन कॉनव्हे आणि टीम सायफर्ट या न्यूझीलंडच्या सलामी जोडीने चौथ्या टी 20i सामन्यात आक्रमक सुरुवात केली आहे. या सलामी जोडीने 3 ओव्हरमध्ये 30 धावा जोडल्या आहेत. त्यामुळे आता टीम इंडियासमोर या भागीदारीला झटपट ब्रेक लावण्याचा प्रयत्न आहे.

  • 28 Jan 2026 07:03 PM (IST)

    IND vs NZ 4th T20i Live Updates : सामन्याला सुरुवात, न्यूझीलंडची बॅटिंग, कॉनव्हे-सायफर्ट सलामी जोडी मैदानात

    टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड चौथ्या टी 20i सामन्याला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. न्यूझीलंडकडून टीम सायफर्ट आणि डेव्हॉन कॉनव्हे ही सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 28 Jan 2026 06:40 PM (IST)

    IND vs NZ 4th T20i Live Updates : न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन

    टीम सायफर्ट (विकेटकीपर), डेव्हॉन कॉनव्हे, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, मॅट हेन्री, ईश सोढी आणि जेकब डफी.

  • 28 Jan 2026 06:38 PM (IST)

    IND vs NZ 4th T20i Live Updates : टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन

    अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.

  • 28 Jan 2026 06:36 PM (IST)

    IND vs NZ 4th T20i Live Updates : भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, कर्णधार सूर्याचा निर्णय काय?

    टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या टी 20I सामन्यात टॉस जिंकला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने न्यूझीलंड विरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. इशान किशन याच्या जागी अर्शदीप सिंग याला संधी देण्यात आली आहे.

  • 28 Jan 2026 06:22 PM (IST)

    IND vs NZ 4th T20i Live Updates : टी 20I सीरिजसाठी न्यूझीलंड टीम

    डेव्हॉन कॉनव्हे, टीम सायफर्ट (विकेटकीपर), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी, जेम्स नीशम, मायकेल ब्रेसवेल, लॉकी फर्ग्युसन, झॅक्री फाउल्क्स आणि बेव्हॉन जेकब्स.

  • 28 Jan 2026 06:20 PM (IST)

    IND vs NZ 4th T20i Live Updates : टी 20I सीरिजसाठी टीम इंडिया

    संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग.

  • 28 Jan 2026 06:07 PM (IST)

    IND vs NZ 4th T20i Live Updates : भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा सामना

    भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या टी 20i सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस उडवण्यात येईल.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने गुवाहाटीत सलग तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केली. टीम इंडिया या मालिकेत 3-0 ने आघाडीवर आहे. आता उभयसंघातील चौथा सामना हा 28 जानेवारीला खेळवण्यात येत आहे. हा सामना विशाखापट्टणममधील एसीए-व्हीडीसीए स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून सलग चौथा विजय मिळवण्यासाठी उत्सूक आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडसमोर विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान आहे. त्यामुळे न्यूझीलंड या सामन्यातून कमबॅक करण्यात यशस्वी होणार की भारत विजयी घोडदौड कायम राखणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट आपण या ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.