India vs Pakistan | पाकिस्तानचा विजय, पण धोनी, कोहलीने मन जिंकलं, सामन्यातील ‘या’ फोटोंची सोशल मीडियावर खास चर्चा

संपूर्ण भारतभर हा सामना मोठ्या उत्साहाता पाहिला गेला. भारतीय चाहत्यांचा थोडा हिरमोड झाला पण हा सामना अन्य अनेक कारणांमुळे चर्चेत राहीला. सध्या सोशल मीडियावर या सामन्यासंदर्भात बऱ्याच गोष्टी शेअर केल्या जात आहेत.

India vs Pakistan | पाकिस्तानचा विजय, पण धोनी, कोहलीने मन जिंकलं, सामन्यातील या फोटोंची सोशल मीडियावर खास चर्चा
INDAI PAKISTAN MATCH
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 12:15 AM

T20 World Cup 2021 : टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली. हा सामना पाकिस्तानने अगदी सहज खिशात घातला. संपूर्ण भारतभर हा सामना मोठ्या उत्साहात पाहिला गेला. भारतीय चाहत्यांचा थोडा हिरमोड झाला पण हा सामना अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. सध्या सोशल मीडियावर या सामन्यासंदर्भात बऱ्याच गोष्टी शेअर केल्या जात आहेत.

विराटचा फोटो शेअर, नेटकरी म्हणतात ब्यूटी ऑफ गेम

भारत आणि पाकचा सामना म्हटलं की भारतीयांच्या अंगात विरश्री संचारते. काहीही झालं तरी पाकिस्तानला नमवलंच पाहिजे असं प्रत्येक भारतीयाला वाटतं. पण क्रिकेट हा एक खेळ असल्यामुळे यामध्ये यशापयश या गोष्टी ओघाने आल्याच. हा सामना भारताने गमावला असला तरी सध्या टीम इंडियाचा मोठेपणा आजच्या सामन्यात पाहायला मिळालं. पराभूत झाल्यानंतर कसलेही आढेवेढे न घेता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानी खेळाडूंचं अभिनंदन केलं. विराटचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

धोनीचा फोटो ट्रेंडिंगवर

तसेच टीम इंडियाचा मेन्टॉर महेंद्रसिंग धोनीनेदेखील पाकिस्तानी खेळाडूंना खुल्या मनाने शुभेच्छा दिल्या. तसेच धोनीने पाकिस्तानी खेळाडूंसोबत चर्चासुद्धा केली. धोनी आणि पाकिस्तानी खेळाडूंचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

 

उर्वशी रौतेला, अक्षय कुमारच्या उपस्थितीवरुन भन्नाट मीम्स

तसेच आजच्या सामन्यात सिनेक्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. अभिनेत्री प्रिती झिंटा, अभिनेत्री उर्वशी रौतेला तसेच अभिनेता अक्षय कुमार स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यांनी भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढवला. त्यांचेसुद्धा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कॅमेरामॅनचे मानले आभार

सिनेरामतारकांच्या उपस्थितीवरुन काही नेटकऱ्यांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. सामन्यादरम्यान उर्वशीला दाखवल्यामुळे नेकऱ्यांनी कॅमेरामॅनचे आभार मानले आहेत.

इतर बातम्या :

India vs Pakistan | भारत-पाक मुकाबल्यात टीम इंडियाचा पराभव, अंपायरवर टीकेची झोड, मोठी चूक केली ?

आधी डेटिंगची अफवा, नंतर ऋषभ पंतने व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केल्याची चर्चा, आता ऊर्वीशी थेट दुबईत स्टेडियममध्ये मॅच बघायला

India vs Pakistan | टीम इंडियाचे खेळाडू गुडघ्यावर बसले, अन् जगाने सलाम ठोकला, नेमकं कारण काय ?