India vs Pakistan | टीम इंडियाचे खेळाडू गुडघ्यावर बसले, अन् जगाने सलाम ठोकला, नेमकं कारण काय ?

भारतीय संघाचा प्रत्येक खेळाडू गुडघ्यावर बसला आहे. तसेच सामना सुरु होण्यापूर्वीदेखील सर्व खेळाडू सोबतच गुडघ्यावर बसल्याचे पाहायला मिळाले. हा प्रकार नेमका काय आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र भारतीय संघाने सध्या देशभर सुरु असलेल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर या चळवळीला समर्थन दिलं आहे.

India vs Pakistan | टीम इंडियाचे खेळाडू गुडघ्यावर बसले, अन् जगाने सलाम ठोकला, नेमकं कारण काय ?
indian team

T20 World Cup 2021 : सध्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात जोरदार सामना रंगला. कोणाची सरशी होणार आणि कोण पराभूत होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. या सामन्यात भारताचा पराभव झाला. मात्र या सर्व धामधुमीत भारतीय संघाने संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असं काम केलं आहे. भारतीय टीमचा प्रत्येक खेळाडू खेळ सुरु करण्याच्या आधी गुडघ्यावर बसला आहे.

ब्लॅक लाईव्ज मॅटर चळवळीला समर्थन

भारतीय संघाचा प्रत्येक खेळाडू गुडघ्यावर बसला आहे. तसेच सामना सुरु होण्यापूर्वीदेखील सर्व खेळाडू सोबतच गुडघ्यावर बसल्याचे पाहायला मिळाले. हा प्रकार नेमका काय आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र भारतीय संघाने सध्या देशभर सुरु असलेल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर या चळवळीला समर्थन दिलं आहे. गेल्या वर्षी कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड यांची हत्या करण्यात आली होती. याच हत्येनंतर संपूर्ण जगभरात या चळवळीने जोर धरला आहे.

जगभरातून कृष्णवर्णीयांच्या हत्येचा निषेध केला जातोय. गुडघ्यावर बसून या चळवळीत सहभाग नोंदवला जातोय. गुडघ्यावर बसण्याला Taking the knee (टेकिंग द नी) असं म्हटल जात असून त्याला वर्षद्वेषाविरोधातील मोहिमेचं प्रतिक म्हटलं जातंय. भारतीय संघानेदेखील या चळवळीचे समर्थन केले आहे. याच कारणामुळे भारताचे खेळाडू गुडघ्यावर बसल्याचे पाहायला मिळाले.

पाकिस्तानचे खेळाडू गुडघ्यावर बसले नाहीत. पण त्यांनी हृदयाजवळ हात ठेवत ब्लॅक लाईव्ज मॅटर या चळवळीचे समर्थन केले आहे.

इतर बातम्या :

एकामागेएक सलामीवर माघारी परतले, सुरुवात गंडली, पण विराट लढला, एकेरी कमान सांभळत पाकिस्तानच्या गोलंदाजांना भिडला

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करणार का? हार्दिक पंड्या म्हणाला…

T20 WC, India vs Pakistan : पाकिस्तानचा आफ्रिदी भारताला खतरनाक नडला, दोन्ही सलामीवीरांना घातक ठरला, रोहित पायचित, तर राहुलचा त्रिफळा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI