आधी डेटिंगची अफवा, नंतर ऋषभ पंतने व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केल्याची चर्चा, आता ऊर्वीशी थेट दुबईत स्टेडियममध्ये मॅच बघायला

भारताचा फलंदाज ऋषभ पंतने कर्णधार विराट कोहलीला साथ देत चमकदार कामगिरी केली. त्याचं जगभरातील भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून कौतुक होतंय. पण सध्या काही नेटीझन्सकडून एक वेगळा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आधी डेटिंगची अफवा, नंतर ऋषभ पंतने व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केल्याची चर्चा, आता ऊर्वीशी थेट दुबईत स्टेडियममध्ये मॅच बघायला

दुबई : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातला टी 20 सामन्याची गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा होती. अखेर आज तो दिवस उजाळला. जवळपास दोन वर्षांनी स्टेडियममध्ये दोन्ही संघाचे चाहते एन्जॉय करताना दिसले. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची खराब सुरुवात झाली. भारतीय संघाची पडझड झाली. पण भारताचा फलंदाज ऋषभ पंतने कर्णधार विराट कोहलीला साथ देत चमकदार कामगिरी केली. त्याचं जगभरातील भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून कौतुक होतंय. पण सध्या काही नेटीझन्सकडून एक वेगळा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तो फोटो म्हणज अभिनेत्री रौतेलाचा. या सामन्याचा थरार लाईव्ह पाहण्यासाठी दुबईच्या स्टेडियममध्ये ऊर्वीशी रौतेला देखील हजर होती. जेव्हा ती टीव्ही स्क्रिनवर दिसली तेव्हा ती स्पेशल फॅन स्टॅण्डवर तिरंगा फडकवताना दिसली.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातला थरारक सामना दुबईच्या स्टेडियममध्ये आज अभिनेत्री उर्वीशी रौतेला देखील हजर आहे. विशेष म्हणजे ऋषभ पंत चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत असताना सोशल मीडियावर उर्वीशीचे फोटो व्हायरल झाले. या फोटोंमध्ये ऊर्वीशी स्टेडियममध्ये भारताचा तिरंगा फडकविताना दिसत होती. यासोबतच पुन्हा एकदा ऋषभ पंत आणि ऊर्वीशी यांच्यातील प्रेमसंबंधाच्या चर्चांना उधाण आलं. बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेट खेळाडू यांच्यातील प्रेम संबंधांविषयी सोशल मीडियावर चर्चा होणारी ही पहिली वेळ नाही. तसेच ऋषभ आणि ऊर्वशी यांच्या प्रेमसंबंधांची सोशल मीडियावर अधूनमधून चर्चा होत असते.

ऊर्वीशीकडून ऋषभला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

काही दिवसांपूर्वी उर्वीशीने ट्विटरवर ऋषभ पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी देखील दोघांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चाला उधाण आलं होतं. यावेळी तर नेटीझन्सला चांगलीच संधी मिळाली. कारण ऋषभ पंतने जेव्हा चौकार लगावला तेव्हा स्क्रिनवर ऊर्वीशी तिरंगा फडकविताना दिसली. तोच फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसला.

खरंत ऊर्वीशी आणि ऋषभ यांच्यातील प्रेमसंबंधांची सर्वात आधी 2018 साली चर्चा होती. दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा तेव्हा पसरल्या होत्या. सोशल मीडियावर या संदर्भात प्रचंड चर्चा झाल्यानंतर काही दिवसांनी ऋषभ पंतने ऊर्वीशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे त्यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. पण काही दिवसांपूर्वी ऊर्वीशीने ऋषभला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आज स्टेडियममध्ये देखील ऊर्वीशी बघायला मिळाली. दरम्यान, हा सामना बघण्यासाठी उर्वीशीसह अभिनेता अक्षय कुमार, बीसीसीआय अध्यक्ष जय शाह देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते.

क्रिकेट चाहत्यांचे मजेशीट ट्विट

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI