AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: मागच्या वर्षभरापासून अजिंक्य रहाणेच्या पायात काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय – गौतम गंभीर

वाईट काळात वारंवार संधी मिळाली. संपूर्ण टीमने साथ दिली. पण अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) बॅटने काही कमाल करुन दाखवता आली नाही. 2021 पासून अजिंक्य रहाणेचा धावांसाठी संघर्ष सुरु आहे.

IND vs SA: मागच्या वर्षभरापासून अजिंक्य रहाणेच्या पायात काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय - गौतम गंभीर
अजिंक्य रहाणेला संघात स्थान देऊ नका. त्याऐवजी हनुमा विहारीला संधी द्या, असं गौतम गंभीरचं स्पष्ट मत होतं.
| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 8:19 PM
Share

नवी दिल्ली: वाईट काळात वारंवार संधी मिळाली. संपूर्ण टीमने साथ दिली. पण अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) बॅटने काही कमाल करुन दाखवता आली नाही. 2021 पासून अजिंक्य रहाणेचा धावांसाठी संघर्ष सुरु आहे. 10-12 डावात फ्लॉप झाल्यानंतर अजिंक्यने एखाद-दुसरी चांगली खेळी केलीय. जोहान्सबर्ग कसोटीत (Johansburg test) दुसऱ्या डावात मोक्याच्या क्षणी त्याने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे त्याला तिसऱ्या कसोटीत संधी मिळाली. मागच्या दुसऱ्या कसोटीत हनुमा विहारीने दोन्ही डावात चांगली फलंदाजी केली होती. पण तरीही अनुभवाला प्राधान्य देत हेड कोच राहुल द्रविड, विराट कोहली यांनी अजिंक्यला पाठिंबा दिला व तिसऱ्या कसोटीत संधी दिली. (india vs south africa 3rd test capetown After ajinkya rahane out gautam-gambhir comment)

अजून किती संधी द्यायची पण त्याने पुन्हा एकदा निराश केले आहे. मयंक, राहुल आणि पुजारा पॅव्हेलियनमध्ये परतलेले असताना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण रहाणे स्वस्तात बाद झाला आणि संघाला आणखी अडचणीत आणलं. त्यामुळे त्याच्यावर संघ व्यवस्थापन इतकं मेहरबान का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. खरंतर हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर दोघे चांगली कामगिरी करुनही बेंचवर बसले आहेत. केपटाऊन कसोटीत अजिंक्य रहाणे अवघ्या (9) धावांवर बाद झाला. कागिसो रबाडाने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रहाणेने बाद झाल्यानंतर रिव्ह्यू सुद्धा घेतला पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

रहाणेवर गौतम गंभीरने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह अजिंक्य रहाणे बाद झाल्यानतंर गौतम गंभीरने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. रहाणे मागच्या वर्षभरापासून एकसारखीच चूक करतोय. खूप बचावात्मक खेळण्याचा त्याचा प्रयत्न आहे. “रहाणेच्या पायामध्ये मागच्या एकवर्षापासून काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याचा पायच बाहेर येत नाही, ज्यामुळे त्याला बॅलेंस ठेवता येत नाही. दक्षिण आफ्रिकेत चेंडू खूप सीम होतो, त्यामुळे केवळ हाताच्या बळावर फलंदाजी नाही करु शकतं” असे गंभीर स्टार स्पोर्ट्सवरील कॉमेंट्रीमध्ये म्हणाला.

“रहाणेचं फुटवर्क खराब असल्यामुळे त्याला बाहेर जाणाऱ्या आणि आतमध्ये येणारे चेंडू खेळताना अडचण येते. फिरकी गोलंदाजी खेळतानाही तो सहज नसतो” असं गंभीर म्हणाला. तिसऱ्या केपटाऊन कसोटीत अजिंक्य रहाणेला संघात स्थान देऊ नका. त्याऐवजी हनुमा विहारीला संधी द्या, असं गौतम गंभीरचं स्पष्ट मत होतं.

(india vs south africa 3rd test capetown After ajinkya rahane out gautam-gambhir comment)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?