AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: पीटरसन चित्त्याच्या चपळाईने चेंडूवर झेपावला, पाहा पूजारा OUT झाला, ‘त्या’ अविश्वसनीय झेलचा VIDEO

एक अविश्वसनीय झेल घेतला. खरोखरच कसोटी क्रिकेटमधला हा एक सुंदर क्षण होता. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येकजण पीटरसनचं कौतुक करेल. कारण त्याने जबरदस्त फिल्डिंगचा नमुना दाखवला.

IND vs SA: पीटरसन चित्त्याच्या चपळाईने चेंडूवर झेपावला, पाहा पूजारा OUT झाला, 'त्या' अविश्वसनीय झेलचा VIDEO
| Edited By: | Updated on: Jan 13, 2022 | 3:25 PM
Share

केपटाऊन: क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस असं म्हणतात. केपटाऊनच्या मैदानात (Capetown test) भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत आज याचा प्रत्यय आला. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेने चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar pujara) तंबूत पाठवलं. पुजारा खेळपट्टीवर चिकटला की, त्याची विकेट मिळवणं कठीण असतं. त्यामुळेच कसोटीमध्ये उपयुक्त फलंदाजांमध्ये त्याची गणना होते. पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराने 43 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टयांचं स्वरुप बघता या धावा उपयुक्त ठरल्या.

विकेटवर खरा हक्क कीगन पीटरसनचा दुसऱ्याडावात पुजारा स्वस्तात नऊ धावांवर बाद झाला. खरंतर जॅनसेनच्या खात्यात पुजाराची ही विकेट जमा होणार असली, तरी त्यावर खरा हक्क कीगन पीटरसनचा आहे. कारण त्याने एक जबरदस्त झेल घेऊन हा विकेट बनवला.

तिसऱ्यादिवसातील पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जॅनसेनने पूजाराला बाद केले. यामध्ये मोठे योगदान दिले ते कीगन पीटरसनने. जॅनसेनच्या गोलंदाजीवर पीटरसन लेग स्लीपमध्ये उभा होता. त्यानेच पुजाराच अविश्वसनीय झेल पकडला. ज्याने कोणी हा झेल बघितला, ते हैराण झाले. पुजारालाही आपण अशा पद्धतीने आऊट होऊ शकतो, यावर विश्वास बसला नाही.

नेमका कसा झेल घेतला? चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीने तिसऱ्यादिवसाच्या खेळाला सुरुवात केली. दुसऱ्यादिवशी संध्याकाळी दोघांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती, आजही तशीच ते फलंदाजी कायम ठेवतील अशी अपेक्षा होती. पण दिवसातील दुसऱ्याच चेंडूवर भारताला झटका बसला. मार्को जॅनसेनने शॉर्ट पीच बॉल टाकला. चेंडूला उसळी मिळाली आणि चेंडू पुजाराच्या हाताला लागून लेग स्लीपला गेला. तिथे उभा असलेला कीगन पीटरसन चित्याच्या चपळाईने चेंडूवर हवेत झेपावला व एक अविश्वसनीय झेल घेतला. खरोखरच कसोटी क्रिकेटमधला हा एक सुंदर क्षण होता. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येकजण पीटरसनचं कौतुक करेल. कारण त्याने जबरदस्त फिल्डिंगचा नमुना दाखवला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.