Rishabh Pant: ‘तोंड नको,बॅट चालव’, ऋषभने मॉर्नी मॉर्केल, गावस्करांच ऐकलं, थेट सेंच्युरिच मारली

वेगवान गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर जिथे रथी-महारथी फलंदाज ढेपाळत होते. तिथे हा 24 वर्षाचा युवा तरुण मुलगा दक्षिण आफ्रिकेच्या आग ओकणाऱ्या वेगवान गोलंदाजांना पुरून उरला.

Rishabh Pant: 'तोंड नको,बॅट चालव', ऋषभने मॉर्नी मॉर्केल, गावस्करांच ऐकलं, थेट सेंच्युरिच मारली

केपटाऊन: नैसर्गिक खेळ वैगेरे बकवास बंद करा, याला संघातून बाहेर काढा, सातत्याने अपयश, टीका यांचा सामना करणारा भारताचा युवा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) आज आपल्या बॅटने सर्वांचीच तोंड बंद केली. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्याडावात ऋषभने अक्षरक्ष: आपली विकेट फेकली होती. म्हणून त्यांच्यावर सर्वचजण तुटून पडले होते. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलने (morne morkel) ‘तोंड नको, बॅट चालवं, नाही तर संघाबाहेर जाशील’ असं सुनावलं होतं.

जे काय बोलला ते बॅटनेच
ऋषभने आज मॉर्नी मॉर्केलचं ऐकलं आणि जे काय बोलला ते बॅटनेच. त्याच्या फलंदाजीच्या बळावरच भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पुजारा आणि रहाणे पाठोपाठ बाद झाल्यानंतर ऋषभ आज फलंदाजीसाठी मैदानात आला. त्यावेळी अजून एक विकेट गेली असती, तर भारताचा डाव आणखी लवकर संपला असता. पण या युवा फलंदाजाने आपल्या खांद्यावर जबाबदारी उचलली व धावफलक हलता ठेवला.

कोहलीने संयम दाखवला
कर्णधार कोहली एकाबाजूला संयमाने फलंदाजी करत असताना ऋषभ दुसऱ्याबाजूने वनडे स्टाइल फलंदाजी करत होता. मोक्याच्याक्षणी दोघांनी केलेली भागादीरी महत्त्वाची ठरली. ऋषभ 100 धावांवर नाबाद राहिला. त्याने शतकी खेळीत सहा चौकार आणि चार षटकार लगावले. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर जिथे रथी-महारथी फलंदाज ढेपाळत होते. तिथे हा 24 वर्षाचा युवा तरुण मुलगा दक्षिण आफ्रिकेच्या आग ओकणाऱ्या वेगवान गोलंदाजांना पुरून उरला.

बेजबाबदार फटका खेळला नाही
जॅनसेनला तर त्याने मैदानावरच बॅटने जे उत्तर दिलं, ते तो कधीच विसरणार नाही. वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या या खेळपट्टीवर फलंदाजी करणं इतकं सोप नव्हतं. तिसऱ्या कसोटीआधी ऋषभ पंत बरोबर चर्चा केल्याचं राहुल द्रविड आणि विराट कोहलीने सांगितलं होतं. आज तिसऱ्या दिवसाच्या खेळात ऋषभने एकही बेजबाबदार फटका खेळला नाही. खराब चेंडूंवर त्याने प्रहार केला. “ऋषभ पंत त्याच्या पद्धतीने फलंदाजी करतोय. आजचा त्याचा खेळ आक्रमक असला, तरी बेजबाबदारपणाचा नाहीय. ऋषभकडून ही तुम्ही अपेक्षा करु शकता” असे आकाश चोप्राने सांगितले.

जॅनसेनला पंतने दिलं उत्तर
लंचनंतर दुसऱ्यासत्रात पंतसमोर जॅनसेन गोलंदाजी करत होता. भारतीय डावातील हे 50 वे षटक होते. पंतने षटकातील पहिले पाच चेंडू सहज खेळून काढले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर पंतने गोलंदाजाच्या दिशेने डिफेंसिव पंच मारला. फटका खेळल्यानंतर पंत त्याच डिफेंसिव पोजिशनमध्ये होता. जॅनसेनकडे तो चेंडू गेल्यानंतर त्याने रागात तो चेंडू पंतच्या दिशेने फेकला. पंतने पुन्हा एकदा जोरात थ्रो मध्ये आलेला तो चेंडू बॅटने पंच केला. पंतचा हा अंदाज बघून कॉमेंटटरनाही हसू आवरले नाही. त्यांनी पंतचे कौतुक केले.


Published On - 7:20 pm, Thu, 13 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI