Virat Kohli: well-done कॅप्टन! आग ओकणाऱ्या चेंडूंसमोर दिसला ‘विराट’ निर्धार

सेंच्युरियनमधलं अपयश विराट कोहलीने (Virat Kohli) आज केपटाऊनमध्ये (Capetown test) भरुन काढलं. त्याने शानदार (79) धावांची खेळी केली. न्यूलँडसच्या खेळपट्टीवर आज विराटने केलेली फलंदाजी खरोखरच कौतुकास्पद आहे.

Virat Kohli: well-done कॅप्टन! आग ओकणाऱ्या चेंडूंसमोर दिसला 'विराट' निर्धार
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 8:55 PM

केपटाऊन: सेंच्युरियनमधलं अपयश विराट कोहलीने (Virat Kohli) आज केपटाऊनमध्ये (Capetown test) भरुन काढलं. त्याने शानदार (79) धावांची खेळी केली. न्यूलँडसच्या खेळपट्टीवर आज विराटने केलेली फलंदाजी खरोखरच कौतुकास्पद आहे. कारण गोलंदाजांना अनुकूल, मदत करणाऱ्या खेळपट्टीवर विराटने कॅप्टन इनिंग पेश केली. 22 यार्डच्या या पीचवर रबाडा, जॅनसेनचे चेंडू आग ओकत होते. फलंदाजांची परीक्षा सुरु होती. विराटवर तर प्रचंड दबाव होता. सातत्याने मीडीयामध्ये मागच्या दोन वर्षातील त्याच्या धावाच्या आकडे दाखवले जात आहेत. (India vs South Africa captain Virat kohli Special fifty in capetown)

आज संयम दाखवला आज विराटने या सगळ्या प्रश्नांना उत्तर देत शानदार खेळी केली. विराटने (79) धावा करण्यासाठी 201 चेंडू घेतले. कसोटीसाठी जो संयम लागतो, तो विराटने दाखवला त्याच्या या खेळीत 12 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. सेंच्युरियनमध्ये चांगल्या सुरुवातीनंतर विराटने आपला विकेट गमावला होता. पण केपटाऊनमध्ये विराटने त्या चूका टाळल्या व निग्रहाने फलंदाजी केली. कसोटी क्रिकेटमध्ये त्याचं हे 28 व अर्धशतक आहे.

विराट आज कव्हर ड्राइव्हचा फटका खेळला? विराट कोहलीचं हे अर्धशतक खास आहे. कारण त्याच्या टेक्निकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. पहिल्या टेस्टमध्ये विराट ऑफ स्टंम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद झाला होता. जोहान्सबर्गमध्ये अनफिट असल्यामुळे विराट खेळला नाही. पण आज विराटने आपल्या बॅटने सर्वच टीकाकारांची तोंड बंद केली. विराटच्या आजच्या खेळीचं वेगळेपण म्हणजे त्याने ऑफ स्टंम्पच्या बाहेर जाणारे चेंडू सोडले. त्याचवेळी कव्हर ड्राइव्ह खेळण्याची एकही संधी सोडली नाही. विराटला कव्हर ड्राइव्ह खेळू नको असा सतत सल्ला दिला जात होता. पण विराटने आपला फेव्हरेट शॉट खेळण्याची एकही संधी सोडली नाही.

विराट क्रीजवर आला तेव्हा काय स्थिती होती? विराट क्रीजवर आला, तेव्हा केएल राहुल आणि मयंक अग्रवाल बाद झाले होते. त्याने विकेटवर येऊन वेळ घेतला व संधी मिळेल तेव्हा कव्हर ड्राइव्हचा फटका खेळला. विराटने चेतेश्वर पुजारासोबत अर्धशतकी भागीदारी केली. पूजारा आणि ऋषभ पंत बरोबर जोडी जमली असे वाटत असतानाच दोघेही बाद झाले व भारताचा डाव अडचणीच आला.

(India vs South Africa captain Virat kohli Special fifty in capetown)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.